'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) या मालिकेच्या माध्यमातून लोकप्रियता मिळालेली बाल कलाकार मायरा वायकुळच्या (Myra Vaikul) घरी गणपती बाप्पा बसला होता. नुकताच मायराने ५ दिवसांच्या गणपती बाप्पाला निरोप दिला. बाप्पाला निरोप (Ganesh Visarjan) देताना मायराने अक्षरश: टाहो फोडला. मायराचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मोठ्या उत्साहात मायराने गणपती बाप्पाला आपल्या घरी आणले होते. पण बाप्पाला निरोप देताना मायराला रडू आवरले नाही. या छोट्या परीला रडताना पाहून कोणाच्याही डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही.
पर्पल मराठी या इन्स्टाग्राम पेजवरून मायरा वायकुळचा गणपती बाप्पाला निरोप देतानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. गणपती बाप्पाला निरोप देण्यापूर्वी मायरा बाप्पाच्या कानामध्ये काही तरी सांगत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर विसर्जन करण्यासाठी बाप्पाची मूर्ती घेऊन जाताना काही मुलं दिसतात. बाप्पाला निरोप देताना मायराला रडू आवरत नाही. मायराचे बाबा तिला समजावण्याचा प्रयत्न करतात पण मायरा ढसाढसा रडतच राहिल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये मायरा आपल्या लाडक्या बाप्पाला म्हणते की, 'देवबाप्पा का रे सोडून गेला मला. रागावलास का माझ्यावर. खरं सांगू आता मला तुझी खूपच आठवण येईल. पुढच्या वर्षी मी तुला खूप खूप लाडू मोदक खायला देईल. पण तू लवकर ये. मी तुझी वाट बघतेय' मायराचे हे गोड बोल तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत. मायराचा बाप्पाला निरोप देताना भावुक झाल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मायराला रडताना पाहून तिच्या चाहत्यांना देखील रडू आवरत नाहीये.
दरम्यान, मायराच्या घरी ज्या दिवशी गणपती बाप्पाचे आगमन झाले त्यावेळी ती खूपच आनंदी झाली होती. मायराने 'आमच्या पप्पांनी गणपती आणला' या गाण्यावर नाचत नाचत बाप्पाला घरी आणले होते. हा व्हिडीओ मायरा वायकुळच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला होता. तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत तिचे कौतुक केले होते. मायराने यावेळी खूपच सुंदर ड्रेस परिधान केला होता. हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.