आपचे खासदार राघव चड्ढा आणि बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आज उदयपुरमध्ये लग्नगाठ बांधणार आहेत. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ही जोडी अखेर आज लग्नबंधनात अडकणार आहेत. मार्च महिन्यापासून यांच्या रिलेशनची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली होती. अनेकदा एकत्र स्पॉट झाले तरी, या दोघांनीही त्यांच्या नात्यावर कधीच भाष्य केले नव्हते. अखेर त्यांनी मे महिन्यामध्ये थेट साखरपुडा करत सर्वांनाच सुखद धक्का दिला.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा आज उदयपुरच्या हॉटेल लीला पॅलेस आणि ताज लेक पॅलेसमध्ये शाही थाटामाटामध्ये लग्नगाठ बांधणार आहे. यांच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. यांच्या लग्नविधीला २२ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. नुकताच काल अर्थात २३ सप्टेंबर रोजी हळद, मेहंदी आणि संगीत सोहळा संपन्न झाला. त्यांच्या लग्नाला अनेक बॉलिवूडमधील दिग्गज सेलिब्रिटी हजेरी लावणार असून दिग्गज राजकारणीही यावेळी उपस्थिती लावणार आहेत. अनेक राजकीय मंडळी काल उदयपूरमध्ये लग्नासाठी दाखल झाले आहेत.
काल रात्री उदयपूरमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, आपचे खासदार संजय सिंह यांच्यासह अनेक दिग्गज राजकारणी लग्नाकरिता दाखल झाले आहेत. अनेक दिग्गज मंडळींची लग्नामध्ये उपस्थिती असल्यामुळे सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. यावेळी बाहेरच्या परिसरामध्ये खाजगी सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात येणार आहेत. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ नये, याकरिता लग्नामध्ये उपस्थिती लावणाऱ्या सर्वच लोकांच्या मोबाईल कॅमेऱ्यावर निळा आणि लाल रंगाची टेप चिकटवण्यात आला आहे.
सध्या सोशल मीडियावर परिणीतीच्या लग्नाला बहिण प्रियंका येणार नसल्याची चर्चा होत आहे. नक्की प्रियंका लग्नाला येणार की नाही?, अद्याप हे सध्या तरी गुलदस्त्यातच आहे. नुकतीच प्रियंकाची आई मधु चोप्रा यांनी पुतणीच्या लग्नाला उपस्थिती लावली आहे. यावेळी त्यांच्या लूकची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. लग्नामध्ये राघव- परिणीतीच्या पेहेरावाची चर्चा होणार हे नक्की. कारण या दोघांच्याही कपड्यांची खास डिझाईन सुप्रसिद्ध फॅशन डिझाईनर मनिष मल्होत्राने डिझाईन सेट केली आहे.
लग्नसोहळ्याच्या विधींबद्दल सांगायचं झालं तर, दुपारी एक वाजता राघवला सेहरा बांधला जाईल. पुढे दोन वाजता राघव यांची मिरवणूक काढली जाईल. पुढे दुपारी ३.३० वाजता दोघेही वरमाळा बांधत एकत्र सप्तपदी घेतील. पुढे सायकाळी 6.30 वाजता परिणीतीची पाठवणी होईल. तर रात्री ८.३० वाजता उदयपुरमधील हॉटेल लीला पॅलेस आणि हॉटेल ताज लेक पॅलेस इथे रिसेप्शन पार पडेल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.