Gandhi Godse Ek Yudh Teaser Out Instagram @chinmay_d_mandlekar
मनोरंजन बातम्या

Gandhi Godse Ek Yudh: 'गांधी गोडसे: एक युद्ध', राजकुमार संतोषींच्या सिनेमाचा टीझर प्रदर्शित

राजकुमार संतोषी या चित्रपटाच्या माध्यमातून ९ वर्षांनी दिग्दर्शन क्षेत्रात पुन्हा पदार्पण करत आहेत.

Pooja Dange

Gandhi Godse Ek Yudh Teaser Out: सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या आगामी चित्रपट 'गांधी गोडसे: एक युद्ध' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. राजकुमार संतोषी या चित्रपटाच्या माध्यमातून ९ वर्षांनी दिग्दर्शन क्षेत्रात पुन्हा पदार्पण करत आहेत. ऑस्कर पुरस्कार विजेते संगीतकार ए आर रहमान यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे.

या टीझरमध्ये महात्मा गांधी आणि गोडसे यांच्यातील वैचारिक मतभेद दाखविले आहेत. टीझरच्या सुरूवातीला 'गांधी आणि गोडसे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. गांधी यांची हत्या झाली आहे आणि गोडसेचा आवाज दाबण्यात आला आहे.' असा व्हाईस ओव्हर देण्यात आला आहे. तसेच चित्रपटातील इतर पात्रे देखील दाखविण्यात आली आहेत.

टीझरमध्ये महात्मा गांधी यांच्या हत्येपासून ते गोडसेच्या अटकेपर्यंत आणि त्याचे जेलमधील वास्तव्य दाखविण्यात आले आहे. तसेच टीझरमध्ये गोळीबार, दंगल, हिंसाचाराचे दृश्ये दाखविण्यात आली आहेत. टीझरमध्ये महात्मा गांधी म्हणतात, "जर तुम्हाला हे जग वाचवायचे असेल, मानवता वाचवायची असेल तर हिंसाचार थांबवायला हवा."

गांधी यांच्या या वक्तव्यावर गोडसे म्हणतो, "तुमच्याकडे एक अतिशय घातक हत्यार आहे, आमरण उपोषण, ज्याचा तुम्ही वारंवार वापर करून लोकांना तुमचा मुद्दा पटवून देता. ही एक प्रकारची मानसिक हिंसा आहे. या चित्रपटाचे लेखन असगर वजाहत आणि राजकुमार संतोषी यांनी केले आहे.

चित्रपटामध्ये महात्मा गांधी यांची भूमिका दीपक अंतानी आणि गोडसेची भूमिका चिन्मय मांडलेकर यांनी साकारली आहे. आरिफ झकेरिया आणि पवन चोप्रा या कलाकारांनीही या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट २६ जानेवारीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच या चित्रपटाच्या एक दिवस आधी शाहरुख खानचा 'पठान' देखील प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

SCROLL FOR NEXT