Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18 : पहिल्या आठवड्यात कोणाचं झालं Eviction? सदावर्तेंना मिळाला मोठा धक्का

Gunaratna Sadavarte : 'बिग बॉस 18' च्या पहिल्या 'वीकेंड का वार'ला कोण घराबाहेर गेल आणि कोण सेफ झालं जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'बिग बॉस 18' (Bigg Boss 18) हा सध्या चांगलाच चर्चेत आहेत. बिग बॉसच्या घरात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी धमाकूळ घातला आहे. त्यांनी बिग बॉसच्या घरात त्यांच्या पाळीव गाढवासोबत एन्ट्री घेतली आहे. पहिल्याच आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत सदावर्ते हे नॉमिनेट झाले होते. या सीझनचा पहिला वीकेंडचा वार पार पडला आहे.

या आठवड्यात 'बिग बॉस 18' च्या घरात चाहत पांडे, करण वीर मेहरा, मुस्कान बामने, अविनाश मिश्रा या सदस्यांसोबत गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) हे देखील नॉमिनेट झाले होते. त्यांना करण वीर मेहराने नॉमिनेट केले होते. मात्र या आठवड्यात एलिमिनेशन झाले नाही आहे. गुणरत्न सदावर्तेंसोबतच घरातील इतर सदस्य देखील या आठवड्यात सेफ झाले आहेत.

'बिग बॉस 18' मध्ये मात्र आता एक ट्विस्ट आला आहे. या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून कोणता सदस्य नाही तर 'गधराज' (Gadharaj) म्हणजे गुणरत्न सदावर्ते यांचा पाळीव गाढव बाहेर जाणार आहे. यापुढे सदावर्ते यांचा गाढव बिग बॉसच्या घरात दिसणार नाही. 'बिग बॉस'ने सोशल मीडियावर पोस्ट करून ही बातमी चाहत्यांना दिली आहे. 'बिग बॉस'च्या घरात गाढव ठेवल्यामुळे PETA (People for The Ethical Treatment of Animals) या संस्थेने नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे बिग बॉसने हे पावलं उचलले. येत्या बिग बॉसच्या एपिसोडमध्ये काय होणार आणि वकिल गुणरत्न सदावर्ते घरात कोणता राडा घालणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कराडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध

Assembly Election: बल्लारपूरमध्ये रंगणार तिरंगी लढत; सुधीर मुनगंटीवारांपुढे काँग्रेसच्या संतोष सिंह रावतांचं आव्हान

SCROLL FOR NEXT