Dharmendra On Gadar 2 Success Twitter
मनोरंजन बातम्या

Dharmendra On Gadar 2 Success: ‘गदर २’चं यश पाहून धर्मेंद्र यांनी मानले चाहत्यांचे आभार, ‘नशिबवान वडील...’ म्हणत शेअर केला भावनिक VIDEO

Dharmendra And Sunny Deol Video: सनी देओलच्या ‘गदर २’ ला मिळालेले यश साजरा करण्यासाठी लेक सनीने धर्मेंद्र यांना अमेरिकेत नेले आहे.

Chetan Bodke

Dharmendra On Gadar 2 Success

सध्या अनेक बॉलिवूड चित्रपटांची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘गदर २’ आणि ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या दोन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. सध्या ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि मुलगा सनी देओल परदेशात सुट्टीचा आनंद लुटत आहेत. यांच्यासोबत सनी पत्नी प्रकाश कौर सुद्धा सुट्टीचा आनंद लुटताना दिसत आहेत. अभिनेते सनी देओल यांच्या ‘गदर २’ला बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत चित्रपटाला मिळालेल्या यशाचे जंगी सेलिब्रेशन केले होते. पण आता सनी देओलच्या चित्रपटाला मिळालेले यश साजरा करण्यासाठी धर्मेंद्र यांना अमेरिकेत नेले आहे.

अभिनेते धर्मेंद्र सध्या अमेरिकेत मुलगा सनी आणि सुन प्रकाश यांच्यासोबत चांगला वेळ घालवत आहेत. धर्मेंद्र कायमच सोशल मीडियावर कायमच अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात. काही दिवसांपुर्वी त्यांनी सनीसोबत पिज्जा खातानाचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर आता सोशल मीडियावर सध्या सुट्टीचा आनंद लुटत असतानाचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

त्या व्हायरल व्हिडीओत, वडील आणि लेकाची सुंदर बॉन्डिंग चाहत्यांना पाहायला मिळत आहे. आता धर्मेंद्र यांनी खास लेकासाठी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. त्या ट्रीपचा व्हिडीओ शेअर करताना धर्मेंद्र यांना सनीने ट्रिपला नेले यासाठी आभार मानले आहेत.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्वीटर)वर नुकतंच धर्मेंद्र यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांनी मुलगा सनीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसले. व्हिडीओमध्ये धर्मेंद्र म्हणतात, “ ‘थँक्यू सनी.’ या सहलीला मला खूप मज्जा आली. स्वतःची काळजी घे. लवकरच आपले चांगले दिवस येणार आहेत.” व्हिडिओमधील वडीलांचे म्हणणे ऐकून सनी देओल भावूक झाला.

धर्मेंद्र यांनी हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन दिले की, “मित्रांनो, तुमच्या सर्वांचे उत्तर... बलोचपासून सरबजीत सिंगपर्यंत... तुम्ही सर्वजण माझे झाले आहात, तुम्हा सर्वांना मनापासून प्रेम आणि प्रार्थना.” सध्या धर्मेंद्र यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हिडीओसोबतच धर्मेंद्र यांनी एक फोटोही शेअर केला आहे. या शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांनी ‘गदर २’च्या यशाबद्दल प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले आहेत. धर्मेंद्र यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “मित्रांनो, नशिबवान वडील ते असतात, ज्यांचा मुलगा कधी बाप बनतो तर कधी मुलांसोबत भांडतो. ‘गदर २’ च्या यशाचा आनंद लुटण्यासाठी सनीने मला अमेरिकेत आणलं आहे. ‘गदर २’ला तुम्ही ब्लॉकबस्टर चित्रपट बनवल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो.” सध्या या बापलेकाच्या जोडीच्या फोटोवर आणि व्हिडिओवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

सनी देओल, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा च्या ‘गदर २’ने जगभरात ६८४.५९ कोटींचा टप्पा गाठला आहे. तर ‘गदर २’ने भारतात तब्बल ५२२ कोटींचा टप्पा गाठला आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी ‘दंगल’ आणि ‘केजीएफ’चा रेकॉर्ड मोडला होता. ‘गदर २’ हा २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा सीक्वल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nanded Flood: नांदेडमध्ये पाऊसहल्ला! संसार उघड्यावर, ५ जणांचा मृत्यू; जनावरेही गेली वाहून, विदारक परिस्थिती

Amruta Khanvilkar: पिवळ्या अनारकली ड्रेसमध्ये 'चंद्रा' च सौंदर्य खुललं, फोटो पाहा

Asia Cup India Squad : हार्दिकला मोठा झटका, शुभमन गिलकडे मोठी जबाबदारी, आशिया कपसाठी सूर्याच्या शिलेदारांची निवड

Maharashtra Rain Live News: रायगड जिल्ह्यात घरावर दरड कोसळून महिलेचा मृत्यू

Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार; जिल्ह्यातील १४ धरण ओव्हर फ्लो

SCROLL FOR NEXT