Nana Patekar New Film Muhurta Twitter
मनोरंजन बातम्या

Nana Patekar New Film: नाना पाटेकरांचा नवा चित्रपट येतोय; ‘गदर २’ च्या दिग्दर्शकांनी केली आगामी चित्रपटाची घोषणा

Journey Muhurta: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी बाबा काशी विश्वनाथ यांच्या चरणी नतमस्तक होत ‘गदर २’ च्या दिग्दर्शकांसोबत आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.

Chetan Bodke

Nana Patekar New Film

अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर २’ने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. ‘गदर २’च्या दिग्दर्शकांनी नुकतंच नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. बाबा काशी विश्वनाथ यांच्या आशीर्वादाने दिग्दर्शकांनी नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. नव्या चित्रपटाची घोषणा त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) वरून केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सनी देओल आणि अमिषा पटेलच्या ‘गदर २’ची सोशल मीडियावर आजही प्रचंड चर्चा होते. चित्रपटाने एकट्या भारतात ६०० कोटींहून अधिक तर जगभरात ९०० कोटींच्या आसपास कमाई केली होती. चित्रपटाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर चाहत्यांना अनिल शर्मा यांच्या आगामी चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. नुकतंच दिग्दर्शकांनी आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.

दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून त्यांच्या आगामी ‘जर्नी’ या चित्रपटाची घोषणा केली. अनिल शर्मा यांनी फोटो शेअर करत कॅप्शन दिले की, “ ‘गदर २’च्या यशानंतर बाबा काशी विश्वनाथ यांच्या चरणी लीन होत आम्ही आमच्या पुढच्या ‘जर्नी’ची सुरुवात केली.” दिग्दर्शकांनी शेअर केलेल्या नव्या फोटोमध्ये दिग्दर्शक अनिल शर्मा, त्यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर दिसत आहेत. फोटोमध्ये नाना पाटेकरांच्या गळ्यात लाल रंगाची शाल आणि हार दिसत आहे. (Bollywood Film)

अनिल शर्मा यांच्या आगामी चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत नाना पाटेकर दिसणार असल्याने चाहते या चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहेत. दिग्दर्शकांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली नाही. अनिल शर्मा यांनी चाहत्यांना ‘गदर’ आणि ‘गदर २’ सारखे चित्रपट दिले आहेत. त्यासोबतच ‘जिनियस’ आणि सलमान खानच्या ‘वीर’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. आता चाहते ‘जर्नी’ या आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT