Luana Andrade Died: कॉस्मेटिक सर्जरीदरम्यान प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू, २९ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

Actress Luana Andrade: लुआनाला कॉस्मेटिक सर्जरी करणं महागात पडलं आहे. त्यामुळेच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Luana Andrade
Luana Andrade Saam Tv
Published On

Luana Andrade Death:

प्रसिद्ध अभिनेत्री आणि ब्राझीलची मॉडेल लुआना आंद्राडेचे (Luana Andrade) निधन झाले आहे. अभिनेत्रीने २९ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. ७ नोव्हेंबरला दुपारी तिचं निधन झालं. अभिनेत्री 'पॉवर कपल ६', ब्राजीलियाई टीव्ही शो, डोमिंगो लीगलमध्ये स्टेज असिस्टंट म्हणून ओळखली जात होती. लुआनाला कॉस्मेटिक सर्जरी करणं महागात पडलं आहे. त्यामुळेच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लिपोसक्शन सर्जरीदरम्यान लुआनाला चार वेळा हृदयविकाराचा झटका आला. ती साओ पाउलोची रहिवासी होती. ब्राझीलचा फुटबॉल स्टार नेमारसह अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी लुआना आंद्राडेच्या निधनानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली. फुटबॉलपटू नेमारने लुआनालाबद्दल एक्सवर ट्विट करत लिहिले की, 'माझी मैत्रिण लुआनाचा मृत्यू झाला आहे. तिच्या संपूर्ण कुटुंबाप्रती माझ्या संवेदना.'

Luana Andrade
Bigg Boss 17 Wild Card Contestant: नवऱ्याच्या मदतीसाठी बिग बॉसच्या घरात ‘दबंग गर्ल’ करणार एन्ट्री, कोण आहे ‘ही’ प्रसिद्ध युट्यूबर?

सॅन लुइस हॉस्पिटलमध्ये लिपोसक्शन सर्जरीदरम्यान लुआना आंद्रेडचा मृत्यू झाला. कॉस्मेटिक सर्जरीदरम्यान लुआनाला अचानक श्वास घेण्यास त्रास झाला आणि तिला हृदयविकाराचा झटका आला. ज्यामुळे शस्त्रक्रिया थांबवण्यात आली. त्यानंतर आयसीयूमध्ये तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. पण पहाटे साडेपाच वाजता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

Luana Andrade
Elvish Yadav: पोलिसांनी विचारलेल्या या १० प्रश्नांनी एल्विश यादवला फुटला घाम, चौकशीदरम्यान काय घडलं?

डेली मेलच्या वृत्तानुसार, लुआनाच्या निधनानंतर रुग्णालय प्रशासनाने आपले निवेदन जारी केले आहे. रुग्णालयाने सांगितले की, सर्जरीमध्ये व्यत्यय आला. चाचण्यांमधून "मॅसिव्ह पल्मोनरी एम्बोलिझम" दिसून आले. हृदयविकाराच्या झटक्यानंतर लुआनाला आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते. जिथे तिला औषधोपचार आणि हेमोडायनामिक उपचार देण्यात आले होते."

शल्यचिकित्सक डिओव्हान रुआरो यांच्या म्हणण्यानुसार, तपासणीदरम्यान लुआना आंद्रेडची प्रकृती ठीक होती.ऑपरेटिव्हपूर्व सखोल तपास करण्यात आला. दुर्दैवाने आम्ही तिला वाचवू शकलो नाही याचे आम्हाला दुःख होत आहे. कधीकधी लिपोसक्शन प्रक्रियेवेळी अशी घटना घडत असतात.

Luana Andrade
Allu Aravind On KGF Yash: ‘केजीएफ’ रिलीज होण्याआधी यश कोण होता?, टॉलिवूडमधल्या बड्या निर्मात्याचा खळबळजनक सवाल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com