Neymar Girlfriend And Daughter Kidnap Attempt
Neymar Girlfriend And Daughter Kidnap Attemptsaam tv news

Neymar Junior News: धक्कादायक! प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारची गर्लफ्रेंड अन् नवजात बाळाच्या अपहरणाचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

Neymar Girlfriend And Daughter Kidnap Attempt: ब्राझीलचा प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारच्या गर्लफ्रेंड अन् नवजात बाळाच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Published on

Neymar Girlfriend And Daughter Kidnap Attempt:

ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार (Neymar Junior) नेहमीच आपल्या मैदानातील कामगिरीमुळे चर्चेत असतो. मात्र यावेळी आपल्या मैदानातील कामगिरीमुळे नव्हे तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याची गर्लफ्रेंड ब्रुना बियानकार्डीसोबत (Bruna Biancardi) धक्कादायक घटना घडली आहे. ब्राझीलमधील बियानकार्डीच्या घरावर ३ अझातांनी दरोडा घातला. तसेच बियानकार्डी आणि तिच्या बाळाला किडनॅप करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या.

ही घटना ७ नोव्हेंबर रोजी घडली आहे. ज्यावेळी हे ३ आरोपी तिच्या घरात घुसले त्यावेळी बियानकार्डी घरी नव्हती. आरोपींनी बियानकार्डीच्या आई वडीलांना बांधून ठेवलं. मात्र ते सुरक्षित असल्याचं म्हटलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बियानकार्डी आणि तिचे आई- वडील सुरक्षित आहेत. ज्यावेळी त्यांनी दरोडा टाकला तेव्हा आम्ही घरी नव्हतो असं बियानकार्डीने म्हटलं आहे.

आर ७ च्या वृत्तपत्राच्या वृ्त्तानुसार, बियानकार्डीचे वडील घटनास्थळी उपस्थित होते. मात्र त्यावेळी त्यांना बांधून ठेवण्यात आलं होतं. म्युनिसिपल सिव्हील गार्डने दिलेल्या माहितीनुसार,पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे.

Neymar Girlfriend And Daughter Kidnap Attempt
World Cup 2023: न्यूझीलंड,पाकिस्तान की अफगाणिस्तान? टीम इंडियासोबत सेमीफायनलमध्ये कोण भिडणार? वाचा समीकरण

हा संशयित व्यक्ती त्याच परिसरात राहतो ज्या परिसरात बियानकार्डी कुटुंबाचं घर आहे. असं म्हटलं जात आहे की, याच आरोपीने घरात जाण्याचा प्लान सुचवला असेल.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन संशयित सशस्त्र नेमारच्या मुलीचा आणि गर्लफ्रेंडचा शोध घेता होते. मात्र सुदैवाने जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा दोघेही घरी नव्हते. (Latest sports updates)

Neymar Girlfriend And Daughter Kidnap Attempt
IND vs PAK, World Cup 2023 : भारत-पाकिस्तान सेमीफायनलमध्ये भिडणार? कसं आहे पॉईंट टेबलचं समीकरण?

बियानकार्डी यांच्या घरात काही चुकीच्या हालचाली होत असल्याचं जाणवताच शेजारच्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घराला घेरलं. एका संशयिताला पकडण्यात यश आलं आहे. तर इतर २ संशयित बॅग, घड्याळ आणि दागिने घेऊन फरार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com