Kapil Sharma Cafe Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kapil Sharma च्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; जबाबदारी स्वीकारणारे गोल्डी ढिल्लों आणि कुलदीप सिद्धू कोण? पाहा हादरवणारा VIDEO

Kapil Sharma: कॅनडामधील प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅफेवर लॉरेन्स बिश्नोई टोळीने हल्ला केला आहे. गेल्या चार महिन्यांत कपिल शर्माच्या रेस्टॉरंटवर झालेला हा तिसरा हल्ला आहे.

Shruti Vilas Kadam

Kapil Sharma: प्रसिद्ध विनोदी कलाकार कपिल शर्माच्या कॅनडास्थित कॅप्स कॅफेवर पुन्हा एकदा हल्ला झाला आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अलिकडच्या काळात कपिल शर्माच्या कॅनेडियन कॅफेवर दोन वेळा हल्ला करण्यात आला होता आणि ही तिसरी वेळ आहे.

गेल्या चार महिन्यांत कॅनडातील सरे येथील कपिल शर्माच्या रेस्टॉरंटवर हल्ला होण्याची ही तिसरी वेळ आहे. गुंड गोल्डी ढिल्लन आणि कुलदीप सिद्धू यांनी सोशल मीडियावर या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. हे दोघेही गुंड डॉन लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीचा भाग आहेत.

तीन फेऱ्या गोळीबार

वृत्तानुसार, कॅफेवर किमान तीन फेऱ्या गोळीबार करण्यात आला. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, यामध्ये गोळीबारानंतरचे काही क्षण दृश्य दाखवले आहेत. स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

कॅफे सरे येथे आहे

कपिलचा कॅफे कॅनडातील ब्रिटिश कोलंबियातील सरे येथे आहे. रेस्टॉरंट उद्योगात प्रवेश करताना कपिलचा हा पहिला कॅफे आहे. कपिलने त्याच्या कॅफेच्या उद्घाटनाची घोषणा केली तेव्हा सेलिब्रिटींनी त्याचे अभिनंदन केले. लोकांनी कॅफेला भेट दिल्यानंतर त्याचे कौतुकही केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MS Dhoni आयपीएलच्या किती सामन्यांना मुकणार? का असणार संघाबाहेर?

Bihar Politics: राजकारणातील सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री देणार CM पदाचा राजीनामा

अमेरिकेत ट्रम्पविरोधात 'नो किंग्स' आंदोलन; 90 लाख नागरीक उतरले रस्त्यावर, कारण काय?

'वेलकम टू हेल' इराणचा अमेरिकेला इशारा, इराणची धमकी, जगाला धडकी

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची पुन्हा चर्चा, दादांच्या राष्ट्रवादीकडून विलिनीकरणाची ऑफर

SCROLL FOR NEXT