राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची पुन्हा चर्चा, दादांच्या राष्ट्रवादीकडून विलिनीकरणाची ऑफर

Ncp Merger Talks Return Maharashtra Pawar Factions: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा रंगलीय.. मात्र या चर्चेनंतर राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का? दादांच्या राष्ट्रवादीनं नेमकी काय अट ठेवलीय... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Renewed discussions around NCP merger bring Sunetra Pawar and both factions back into political focus in Maharashtra.
Renewed discussions around NCP merger bring Sunetra Pawar and both factions back into political focus in Maharashtra.Saam Tv
Published On

अजितदादांच्या निधनानंतर राज्यात सुरु झालेली दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा मध्यांतरी थंडावली.. अशातच वेगवेगळ्या प्रकरणांमुळे दादांच्या राष्ट्रवादीचे नेते अडचणीत आले... त्यामुळे आता पक्षाची विस्कटलेली ही घडी बसवण्यासाठी थेट अजितदादांच्या शिलेदारानं नवा प्रस्ताव ठेवलाय.. सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात दोन्ही पक्ष एकत्र आल्यास आनंद होईल, असं विधान करून आमदार सुनील शेळकेंनी विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा वाट मोकळी करून दिलीय..

खरतर दादांच्या मृत्यूनंतर दोन्ही पक्षाच्या विलीनीकरणासाठी स्वतंत्र बैठका झाल्या होत्या...शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांनी विलिनीकरणावर सकारात्मक भूमिकाही घेतली होती.. अशातच सुनील शेळकेंनी केलेल्या विधानामुळे विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण आलयं... मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आपल्या पक्षाकडे विलिनीकरणासंदर्भात कुठलाच प्रस्ताव आलेला नसल्याचं स्पष्ट केलयं...

दरम्यान राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय सुनेत्रा पवार घेतील, असं विधान साम टिव्हीला प्रतिक्रिया देताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी केलयं... त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर सुनेत्रा पवार नेमकी काय भूमिका घेतात? तसंच मित्र पक्ष भाजपलाही विलीनीकरण मान्य होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com