Story Behind Jhimma 2 movie Hemant Dhome's Interview on Jhimma 2 marathi movie - Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jhimma 2 Story: तुम्ही पाहिलेल्या ‘झिम्मा २’ची स्टोरी आहे रियल, दिग्दर्शकाच्या सासूबाईंवरच आधारित आहे कथा

Jhimma 2 Hemant Dhome News: चित्रपटाची कथा काल्पनिक नसून एक रियल स्टोरी आहे. नुकतंच चित्रपटाच्या कथेबद्दल दिग्दर्शकाने एका मुलाखतीतून सांगितले आहे.

Chetan Bodke

Director Hemant Dhome Shared Behind Story Jhimma 2 movie

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. चित्रपटाने आतापर्यंत एकूण ७. ४० कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे.

चित्रपटाची कथा काल्पनिक नसून एक रियल स्टोरी आहे. आणि ही चित्रपटाची स्टोरी एका अभिनेत्रीच्या लाईफवर आधारित आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून उज्वला जोग आहेत. उज्वला जोग ह्या क्षिती जोगच्या आई आहेत. नुकतंच चित्रपटाच्या कथेबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमेने एका मुलाखतीतून सांगितले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नुकतंच चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, दिग्दर्शक हेमंत ढोमेने राजश्री मराठी या एंटरटेंमेंट युट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीतून त्याने चित्रपटाच्या कथेबद्दल सांगितले आहे. मुलाखतीमध्ये दिग्दर्शक हेमंत ढोमेने सांगितले की, “चित्रपटाची कथा, माझी सासू आणि क्षितीची आई उज्वला जोग ह्यांच्या लाईफवर आधारित आहे. त्यांचा एक ॲक्सिडंट झाला होता. त्या ॲक्सिडंटनंतर त्यांची एक मोठी सर्जरी झाली होती.”

“खरंतर त्यांचा तो ॲक्सिडंट इतका मोठा झाला होता, त्यातून त्यांचा पुनर्जन्म झाला होता. त्यांना डॉक्टरांनी एक मोठं ऑपरेशन सांगितलं होतं. त्या ऑपरेशनमध्ये त्या दगावल्या तरी मी तयार आहे, असं क्षिती त्या डॉक्टरांना म्हणाली होती. त्यांचं ते ऑपरेशन सक्सेसफुल झालं.” (Marathi Film)

“ज्या दिवशी उज्वला जोग यांच्यावर ती शस्त्रक्रिया पार पडली, त्या दिवशी डॉक्टर त्यांना वाढदिवसाच्या न विसरता शुभेच्छा देतात. त्याच दिवशी आम्ही सुद्धा उज्वला जोग यांचा वाढदिवस साजरा करतो. तो खरा त्यांचा वाढदिवस आहे. त्या ऑपरेशननंतर उज्वला यांना डेली रुटिनमध्ये येण्यासाठी बराच काळ लागला. जस जशा त्या डेली रुटिनमध्ये येऊ लागल्या तेव्हा त्या आपला हा पुनर्जन्म आहे, असा विचार करत फिरण्याचा विचार करु लागले. आता मी वेगवेगळ्या ठिकाणी फिरणार, मला वेगवेगळे देश फिरायचे आहे. असं त्यांनी आम्हाला सांगितलं. जवळपास त्यांनी आतापर्यंत ७५% जगभरामध्ये भ्रमंती केली आहे.” (Film Director)

“त्यांच्यामध्ये जे फिरण्याचं वेड आहे ना ते खूप जबरदस्त आहे. जेव्हा त्यांनी मला सांगितलं, जेव्हा तुम्ही ‘झिम्मा ३’ कराल ना तर तो ऑस्ट्रेलियाला करा. आणि मला त्यामध्ये जास्त नाही फक्त दोनच सीन्स द्या. ऑस्ट्रेलियामध्ये मला खूप धम्माल मस्ती करायची आहे. तिथे मला माझं २० दिवस राहायचं आहे. ज्या महिलेने इतकं जवळून मृत्यू पाहिला, तिला तिचा जन्म परत मिळाला, तिला असं वाटतं आता तरी आपण फिरलं पाहिजे. फिरणं का महत्वाचं आहे?, याचं महत्व सांगणारा हा चित्रपट आहे.” (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT