Urfi Javad Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed Controversy: उर्फीच्या अडचणींमध्ये वाढ, फैजान अन्सारीने काढला उर्फी विरोधात फतवा...

उर्फीवर अश्लील कपड्यांवरुन संताप जाहीर करत फतवा जारी करण्यात आला आहे.

Chetan Bodke

Urfi Javed Controversy: टेलिव्हिजन अभिनेत्री उर्फी जावेद कोणाला ठाऊक असा व्यक्ती मिळणं सध्या अशक्य आहे. उर्फीच्या हटक्या फॅशनमुळे ती सध्या सर्वत्र बरीच चर्चेत होती. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीला तिच्या कपड्यावरुन चांगलेच सुनावले होते. आता पुन्हा एकदा उर्फी तिच्या कपड्यांवरुनच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अश्लील कपड्यांवरुन संताप जाहीर करत फतवा जारी करण्यात आला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारी (Faizan Ansari) याने हा फतवा काढला आहे.

उर्फी नेहमीच आपल्या विचित्र फॅशनसेन्समुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. तिच्या कपड्यांमुळे तिला अनेकदा नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. कधी ब्लेड, झाडांच्या पानांची, फुलांची, सिम कार्ड तर कधी काचेच्या तुकड्यांनीही फॅशन केली होती. अशा अश्लील कपड्यांवरुन संताप जाहीर करत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारीने हा फतवा काढला आहे. काढलेल्या फतव्यात, जेव्हा उर्फीचं निधन होईल तेव्हा तिला दफनभूमीत जागा दिली जाणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

फैजान अन्सारीने उर्फी जावेदसंबंधी (Urfi Javed) दफनभूमीत अर्ज दिला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्याने सांगितलं की "उर्फी जावेदच्या विरोधात फतवा जारी करण्यात आला आहे. त्यांचं म्हणणं आहे की, जेव्हा कधी मुस्लीम तरुणी नग्न फिरते तेव्हा लाज वाटते. उर्फीने इस्लामचा अपमान केला आहे. जेव्हा तिचं निधन होईल तेव्हा तिला दफनभूमीत जागा देणार नाही. अन्सारी यांनी जुहूच्या दफनभूमीत हा अर्ज केला आहे."

सोबतच पुढे ते म्हणतात अन्सारी म्हणतात, 'असे कपडे घालून उर्फीने जगभरात मुस्लिमांची बदनामी केली आहे. जर ती म्हणाली की ती इस्लामला मानत नाही तर सर्वप्रथम तिने तिचे नाव बदलावे. उर्फीच्या विरोधात फतवा काढण्यासाठी त्यांनी यापूर्वीच दिल्लीच्या मौलाना आणि मुंबई शहरातील दर्ग्यातील काझींकडे अर्ज दाखल केला आहे.'

अन्सारी म्हणाले की उर्फीची इच्छा असेल तर ती तिचा धर्म बदलू शकते. परंतु तिने प्रत्येक धर्माच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. सोबतच, उर्फीने अनेक मुलाखतींमध्ये ती स्वत:ला मुस्लिम असल्याचे मानत नाही. दरम्यान उर्फी जावेदविरोधात फतवा जारी होण्याची ही पहिली वेळ नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टिटवाळा ड्रग्ज प्रकरणात आणखी एकाला अटक, अश्विनी पॉलच्या लिव्ह इन पार्टनरला बेड्या

४० मिनिटं विकेटकिपिंग, १ तास फलंदाजी; एमएस धोनी आयपीएलमध्ये कमबॅक करणार?

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आठव्या वेतन आयोगाबाबत डेडलाइन वाढली; आजच करा हे काम

Stylish Blouse Designs : साडी, लेहेंगा अन् स्कर्ट; एकाच ब्लाउजचे अनेक लूक्स, पाहा ट्रेंडी डिझाइन्स

Nashik TCS Case : लैंगिक शोषण अन् अश्लील टोमणे...; नाशिकच्या TCS धर्मांतर प्रकरणात २० तरुणींनी सांगितली आपबीती

SCROLL FOR NEXT