Farzi Bhuvan Aroara Saam Tv
मनोरंजन बातम्या

Farzi Bhuvan Arora: ‘फर्जी’ फेम भुवन अरोराची सोशल मीडियावर चलती, IMDb मधील ‘या’ पुरस्काराने सन्मानित

IMDb कडून भूवन अरोराला स्टारमीटर पुरस्कार मिळाला आहे.

Chetan Bodke

Farzi Bhuvan Aroara: IMDb (www.imdb.com) ह्या चित्रपट, टीव्ही शोज आणि सेलिब्रिटीजवरील जगातल्या माहितीच्या सर्वांत प्रसिद्ध आणि विश्वसनीय स्रोताने ‘फर्जी’ मधील अभिनेता भुवन अरोराला IMDb “ब्रेकआउट स्टार" स्टारमीटर पुरस्कार दिला. IMDb स्टारमीटर पुरस्कारांमध्ये IMDb च्या एक्सक्लुझिव्ह रँकिंगवर आणि IMDb app- एक्सक्लुझिव्ह प्रसिद्ध भारतीय सेलिब्रिटीज फिचरवर उत्तम प्रदर्शन करणा-या प्रतिभेला मान्यता दिली जाते. जगभरामध्ये IMDb ला दर महिन्याला मिळणा-या 20 कोटींहून अधिक पेज व्ह्यूजनुसार हे निर्धारित होते.

अरोराने केलेली गुन्हेगारीवरील थ्रिलर ‘फर्जी’ मधील भुमिका सध्या बघता येते आहे व भारतातील प्राईम व्हिडिओवरील एका नवीन स्थानिक ओरिजिनल शोची सर्वांत मोठी ओपनिंग साध्य करण्याचा मोठा टप्पा ह्या शोने गाठला आहे. ह्यामध्ये त्याने फिरोजची भुमिका केली आहे जो सनीचा (शाहीद कपूर) बेस्ट फ्रेंड आणि अपराधांमधील वाटेकरी असतो. तो एक कलाकार असतो पण जेव्हा तो अगदी परिपूर्ण खोट्या नोटा बनवतो, तेव्हा तो फसवणुकीच्या अपराधामध्ये ओढला जातो.

भारतामध्ये ह्या वर्षीच्या टॉप वेब सिरीजमध्ये हा शो ट्रेंड होतो आहे. 29 मार्च रोजी त्याचे IMDb युजर रेटिंग8.4 आहे. भारत, अमेरिका, यु.के., कॅनडा, यु.ए.ई., सौदी अरेबिया, बहारीन, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड आणि मलेशियासह जगभरातील अनेक देश प्रदेशांमध्ये प्राईम व्हिडिओवरील टॉप 10 टायटल्समध्ये पोहचण्याचा जागतिक पातळीवरचा सन्मानसुद्धा ह्या थ्रिलरला मिळाला आहे. अरोराने काम केलेल्या अन्य भुमिका शुद्ध देसी रोमान्स, तेवर, द टेस्ट केस आणि बँक चोर हेही आहेत.

फर्जीमधील माझ्या भुमिकेसाठी मला इतके प्रेम देणा-या जगभरातील चाहत्यांना व व्यावसायिकांना मन:पूर्वक धन्यवाद,” अरोराने म्हंटले. “मी अतिशय भावुक झालो आहे, अवाक आहे आणि IMDb ‘ब्रेकआउट स्टार’ स्टारमीटर पुरस्कार स्वीकारताना मला अतिशय कृतज्ञ वाटत आहे. व्यक्तिगत अभिनयासाठीचा हा माझा पहिला पुरस्कार आहे आणि माझ्यासाठी तो खूप खास आहे. धन्यवाद IMDb.”

“फर्जीमधील भुवन अरोराच्या असाधारण प्रदर्शनामुळे जगभरातील श्रोते दंग झाले आहेत व ते त्याच्याबद्दल व त्याच्या अभिनयाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी IMDb वर येत आहेत,” IMDb इंडियाच्या प्रमुख यामिनी पतोडिया ह्यांनी म्हंटले. “भारतीय कंटेंट व प्रतिभेला पुढे आणून आमच्या जागतिक श्रोत्यांपर्यंत नेण्यासाठी IMDb कटिबद्ध आहे. IMDb ‘ब्रेकआउट स्टार’ स्टारमीटर पुरस्काराच्या सर्वांत नवीन विजेत्या भुवनचे आम्ही अभिनंदन करतो”

IMDb ने अलीकडेच सुरू केलेले प्रसिद्ध भारतीय सेलिब्रिटीज फीचर जगभरातील IMDb च्या 20 कोटींहून अधिक मासिक विजिटसवर आधारित आहे. भारतामध्ये राहत असलेल्या ग्राहकांना हे फीचर एक्सक्लुझिव्ह प्रकारे फक्त IMDb अँड्रॉईड आणि आयओएस app वर उपलब्ध आहे. भारतीय सेलिब्रिटीजसह ग्राहक प्रसिद्ध भारतीय मूवीज आणि टीव्ही शोजचे ट्रेलर्ससुद्धा बघू शकतात.

IMDb app सुद्धा ग्राहकांना त्यांच्या वॉचलिस्टमध्ये टायटल्स जोडण्यासाठी, ते बघण्यासाठी व त्यांनी जे बघितले त्याचे रेटिंग करून रिव्ह्यू लिहीण्यासाठी मदत करते. मनोरंजनाचे चाहते Instagram आणि Twitter वरही IMDb ला फॉलो करू शकतात व भारतीय फिल्म्स, वेब सिरीज, प्रतिभा आणि चित्रपट निर्मात्यांबद्दलचे सर्व लेटेस्ट कंटेंट प्राप्त करू शकतात.

आपल्या आवडत्या भारतीय सेलिब्रिटीजबद्दल व टायतल्सबद्दल सर्वांत जास्त काय आवडते, हे चाहते शेअर करू शकतात आणि लेटेस्ट ट्रेलर्स आणि एक्सक्लुझिव्ह IMDb कंटेंट बघू शकतात आणि भारत व जगभरातील नवीन कंटेंट शोधू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS अधिकाऱ्याने आयुष्य का संपवलं? ९ पानी चिठ्ठीतून झाला धक्कादायक उलगडा

Crime News : संतापजनक! १८ वर्षीय तरुणीवर ७ जणांचा सामूहिक बलात्कार; आरोपींमध्ये भावाचाही समावेश

Dry fruits Ladoo: लहान मुलांसाठी बनवा पौष्टिक ड्रायफ्रुट्स लाडू; सोपी रेसिपी वाचा

Sev Recipe : दिवाळीला घरीच बनवा चटपटीत तिखट शेव, मार्केटपेक्षा चव भारी

Maharashtra Live News Update : रबाळे अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपी दिलीप खेडकरचा जामीन कोर्टाने नाकारला

SCROLL FOR NEXT