Aai Kuthe Kay Karte: आधी बाबा गेले आणि आता आईचंही निधन.. मालिकेच्या कलाकारावर कोसळला दुःखाचा डोंगर

‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या लेखिकेवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याबद्दल अभिनेते मिलिंद गवळी यांनी भावूक पोस्ट लिहिली आहे.
Aai Kuthe Kay Karte Serial
Aai Kuthe Kay Karte SerialInstagram

Aai Kuthe Kay Karte : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होते. नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणारी मालिका सध्या नव्या कारणामुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. मालिकेच्या लेखिकेवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी लेखिकेच्या वडिलांचे निधन झाले होते. आता त्यानंतर १६ दिवसांनी लेखिकेने आपल्या आईला देखील गमावले आहे. याबद्दल अभिनेते मिलिंद गवळी यांनी भावूक पोस्ट लिहिली आहे.

Aai Kuthe Kay Karte Serial
Saie Tamhankar Trolled: फुलात फुल जाईचं आता काही खरं नाही सईचं; सोशल मीडियावर अभिनेत्री ड्रेसमुळे ट्रोल

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनिरुद्ध देशमुखची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळीने मालिकेच्या लेखिकेबद्दल भावूक पोस्ट लिहिली आहे. प्रेक्षकांसाठी प्रत्येक एपिसोड रंजक व्हावा याकरिता रात्रं- दिवस विचार करणाऱ्या लेखिकेच्या खासगी आयुष्यात किती दु:ख आहे, याविषयी ते व्यक्त झाले. पडद्यावर नेहमीच आनंदीत राहणाऱ्या व्यक्तीच्या खासगी आयुष्यातील दु:ख प्रेक्षकांसमोर कधी येत नाही, असंही ते म्हणाले.

Aai Kuthe Kay Karte Serial
Ravrambha Teaser: शेवंताच्या नव्या चित्रपटाची घोषणा; अपूर्वा साकारणार ‘हे’ ऐतिहासिक पात्र...

मिलिंद गवळी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणतो, ‘BTS- खऱ्या आयुष्यामध्ये जे आपण डोळ्यांनी बघतो ते नेहमीच तेच खरं असतं असं नाहीये. जे आपल्याला दिसतं त्याच्यामागे खूपशा गोष्टी दडलेल्या असतात, ज्या आपल्यासमोर कधीच येत नाहीत. आपण जे डोळ्यांनी जे पाहतो तेवढंच आपल्याला दिसत असतं, खूपशा गोष्टी पडद्यामागे असतात आणि खूप काही between the lines ही असतं, जे कधीच नाही दिसत. या सिनेमा, नाटक, मालिका या क्षेत्रामध्ये तर सगळंच पडद्यामागनंच असतं.’

तर पुढे मिलिंद गवळी म्हणतात, ‘मालिकेच्या 23-24 मिनिटांच्या एपिसोडसाठी कित्येक दिवस बरीचशी मंडळी बरंच काही करत असतात. पडद्याच्या मागे खूप काही घडत असतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपल्याला दिसत नाही तो लेखक. जो रात्रंदिवस तो डोकं फोडी करत असतो. आता लोकांना काय आवडेल, कुठल्या कलाकाराचा ट्रॅक लोकांना आवडतोय, तो लिहिल्यानंतर कळतं की कलाकाराकडे तारखा उपलब्ध नाहीयेत, तो कलाकार आजारीच पडला आहे. मग परत लेखक डोके फोडी करतो, परत पुन्हा सगळं लिहून काढतो.’ असं त्यांनी लिहिलं.

Aai Kuthe Kay Karte Serial
Bholaa Box Office Collection: 'भोला' झालाय फ्लॉप? आजवरच्या सिनेमांपैकी सगळ्यात कमी कमाई; बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी केला फक्त 'इतका' गल्ला

‘बर लेखकाचं जर सगळं सुरळीत चाललं असेल तर तो हे पण सगळं आनंदाने करतो, पण जर लेखकाच्याच आयुष्यात खूप काही घडत असेल, उलथा पालत होत असेल तर, “आई कुठे काय करते ” च्या लेखिका नमिता वर्तक हिचे वडील प्रसिद्ध समीक्षक कमलाकर नाडकर्णी बरेच महिने आजारी होते, त्यांची सगळी सुश्रुषा करत करत दवाखान्यात सुद्धा नमिताने “आई कुठे काय करते” चे एपिसोड लिहून दिले, 11 मार्चला रात्री दहा वाजता नाडकर्णी काकां गेले, त्या दुःखात सुद्धा “आई कुठे काय करते” चे एपिसोड नमिताने लिहून देत होती, काल 27 मार्च रोजी म्हणजे 16 दिवसांनी आजारपणामुळे नमिताची आई गेली, नमिताच्या दुःखाची कल्पनाच करवत नाही.’

Aai Kuthe Kay Karte Serial
Maidan Teaser: अजयचे ‘मैदान’मध्ये गगनचुंबी उडी; भगत सिंगनंतर अभिनेता साकारणार आणखी एक बायोपिक

मिलिंद गवळी पुढे म्हणतात, ‘आभाळा एवढं दुःख हेच असतं बहुतेक. हे पडद्यामागील दृश्य, जे कधी येत नाही प्रेक्षकांसमोर... हे सगळं सहन करायची तिला शक्ती मिळू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.’ अशा आशयाची भावनिक पोस्ट लिहित मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

मिलिंदच्या या भावनिक पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत लेखिका नमिता वर्तक यांच्यासाठी संवेदना व्यक्त केल्या आहेत. ‘आई कुठे काय करते’ ही मालिका गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. टीआरपीच्या यादीत नेहमीच अव्वल असणाऱ्या या मालिकेत प्रमुख भूमिकेत मिलिंद गवळी, मधुराणी गोखले प्रभुलकर, रुपाली भोसले, ओमकार गोवर्धन हे कलाकार आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com