Bholaa Box Office Collection: 'भोला' झालाय फ्लॉप? आजवरच्या सिनेमांपैकी सगळ्यात कमी कमाई; पहिल्या दिवशी केला फक्त 'इतका' गल्ला

Bholaa 1st Day Collection: भोला चित्रपटाचे पहिल्या दिवशीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत.
Bholaa Box Office Collection
Bholaa Box Office Collection Instagram /@ajaydevgn

Ajay Devgn Movie Bholaa Box Office Collection: अजय देवगणचा 'भोला' काल राम नवमीच्या दिवशी प्रदर्शित झाला. शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित करण्याचं ट्रेंड मोडून अजय देवगणचा हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वी प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची प्रचंड क्रेझ प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळाली.

चित्रपटाचे पोस्टर, मोशन पोस्टर, टीझर आणि ट्रेलरने प्रेक्षकांना खूपच आकर्षित केले. त्यामुळे या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी उत्सुकता दिसली. तसेच अजय देवगणने चित्रपटाचे प्रमोशन करण्यात कोणतीही कसर ठेवली नव्हती. चित्रपटाचे पहिल्या दिवशीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. चला बघू या भोलेनाथ अजय देवगण पावला आहे की नाही.

Bholaa Box Office Collection
Ajay Devgn Movie: हिट चित्रपट देणाऱ्या अजयचा रखडलेला 'मैदान' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

भोला चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग १०-१२ दिवस आधीच सुरू झाले होते. नुकतेच चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विट करत चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी माहिती दिली आहे. 'भोला' चित्रपटाने ११.२० कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. भोला चित्रपटाची ही कमाई सरासरी असल्याचे म्हटले जात आहे.

'भोला'च्या बजेटबद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट जवळपास 125 कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. चित्रपटाचे बजेट पाहता 'भोला'ची सुरुवात बरी झालेली नाही. तर पहिल्या दिवशी दमदार कमाई करणाऱ्या अजय देवगणच्या इतर चित्रपटांच्या ओपनिंग डे कलेक्शन पहिले तर 'भोला'ची कमाई खूप कमी आहे. अजयच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत 'भोला'ने नवव्या स्थानी आहे.

पहिल्या दिवशी भरघोस कमाई केलेल्या अजयच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर, 15 ऑगस्ट 2014 रोजी प्रदर्शित झालेल्या 'सिंघम रिटर्न्स' या यादीत पहिल्या स्थानवर आहे. 'सिंघम रिटर्न्स' चित्रपटाने पहिल्या दिवशी 32.9 कोटींचा गल्ला जमवला होता.

तर, 'गोलमाल अगेन' दुसऱ्या स्थानावर आहे, या चित्रपटाने पहिल्या दिवशी 30.14 कोटींची कमाई केली होती.'टोटल धमाल' चित्रपट 16.50 लाखांच्या कलेक्शनसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'दृश्यम 2' ने पहिल्याच दिवशी 15.38 कोटींची कमाई केली असून तो चौथ्या क्रमांकावर आहे.

त्याचबरोबर 'तान्हाजी'ने पहिल्या दिवशी 15.10 कोटींच्या कलेक्शनसह पाचवे स्थान पटकावले आहे. या सर्व चित्रपटांनी पहिल्याच दिवशी बजेटच्या तुलनेत बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com