Shah Rukh Khan Twitter  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan: प्रदर्शनाआधीच 'पठान' हिट, शाहरुखने घेतलं 'इतकं' मानधन...

एका चाहत्याने 'तू 'पठान' चित्रपटासाठी किती मानधन घेतले?' असा सवाल विचारला होता. यावर त्याने चाहत्याला उत्तर दिले आहे.

Chetan Bodke

Shah Rukh Khan: चार वर्षानंतर मोठ्या पडद्यावर शाहरुख खान पुन्हा एकदा दमदार पदार्पण करणार आहे. 'पठान' चित्रपटातील बेशरम रंग हे गाणे प्रदर्शित झाल्या नंतर त्याला नेटकऱ्यांनी कमालीचे ट्रोल केले होते. सध्या शाहरुख सोशल मीडियावर जबरदस्त चर्चेत असून त्याने नुकतेच 'Ask SRK' हे सेशन घेतले होते. यात त्याला एका चाहत्याने 'तू 'पठान' चित्रपटासाठी किती मानधन घेतले?' असा सवाल विचारला होता. यावर त्याने जरा स्पष्टच उत्तर दिले.

नेहमीच शाहरुख खान सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्याच्या प्रत्येक सोशल मीडियावरील पोस्टवर चाहते भरभरुन प्रतिसाद देत असतात. १० जानेवारीला चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून शाहरुखवर सोशल मीडियावर बराच कौतूकाचा वर्षाव होत आहे.

'Ask SRK' या सेशनमध्ये शाहरुखला चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची त्याने उत्तरं दिली आहेत. त्याच्या चाहत्यांनी त्याला अनेक प्रकारचे प्रश्न विचारले होते. ज्यात एकाने विचारले की, “पठान चित्रपटासाठी किती मानधन घेतलेस?” यावर शाहरुखने कमलीचे उत्तर दिले आहेत.

शाहरुखला गाण्यावरुन जरी आधी ट्रोल केले असले तरी, ट्रेलरमधील अॅक्शन पाहून सर्वांनीच त्याच्यावर कौतूक केले आहे. शाहरुखला मिळालेल्या मानधनावरुन एका चाहत्याने प्रश्न विचारला होता. त्यावर शाहरुख म्हणतो “का? पुढील चित्रपटात घेणार आहेस का?” असा रिप्लाय त्याने दिला आहे.

ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून शाहरुख खान आता चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विविध ठिकाणी फिरत आहे. मात्र चित्रपटाला याआधी बराच विरोध झाला होता. त्यातील गाणी आणि एकूणच तो चित्रपट बॉयकॉट करायची मागणी सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'पठान' चित्रपटात शाहरुख सोबत मुख्य भूमिकेत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम आहे. हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT