Urfi Javed Controversy: चित्रा वाघ अडचणीत येणार? उर्फी जावेद महिला आयोगात, वकिलांनी काय-काय सांगितलं?

उर्फीने आणि तिच्या वकिलांनी आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेतली आहे.
Urfi Javed Controversy
Urfi Javed Controversy Saam Tv
Published On

Urfi Javed Controversy: अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद अद्याप शमलेला नाही. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेतला होता. तिच्याविरोधात पुण्यात तक्रारही दाखल झाली आहे. उर्फीवर कारवाई का होत नाही, असा प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित करत महिला आयोगाला सवाल केले होते. या वादानंतर आज, शुक्रवारी उर्फीने थेट महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेतली.

Urfi Javed Controversy
Urfi Javed Controversy: उर्फी जावेद-चित्रा वाघ यांच्यातील वाद संपेना; आता उर्फी घेणार रुपाली चाकणकरांची भेट

आज दुपारी उर्फी महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेतली आहे. उर्फीने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात अद्याप तक्रार दाखल केली नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. पण ती लवकरच तक्रार दाखल करणार आहे.

Urfi Javed Controversy
Urfi Javed Controversy: 'ही कधीच सुधारणार नाही' उर्फी जावेदचा ड्रेस पाहून नेटकरी पुन्हा संतापले

उर्फीच्या वकिलांनी काय सांगितलं?

उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वादानंतर उर्फीच्या वकिलांनी माहिती दिली आहे. उर्फी जावेद ही एक मॉडेल आहे. चित्रा वाघ तिला धमकी देत आहे. तिच्या जीवाला धोका आहे. सार्वजनिक ठिकाणी चित्रा वाघ या धमकी देत आहेत. चित्रा वाघ या उर्फी जावेदला ती विशिष्ट समाजाची असल्याने लक्ष्य करत आहेत. उर्फी जावेद स्वतः आयोगाच्या कार्यालयात येऊन आपली भूमिका मांडेल, असे उर्फीचे वकील नितीन सातपुते यांनी सांगितले.

Urfi Javed Controversy
Ved Box Office Collection: 'वेड' चित्रपटाचा चौदाव्या दिवशी सुद्धा कोट्यावधींचा गल्ला

उर्फी जावेदनं महिला आयोगाला दिली माहिती

दरम्यान, उर्फी जावेदने अद्याप लेखी तक्रार दिलेली नाही, असे सूत्रांकडून कळते. तिने आज महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत माहिती दिली.

सोशल मीडियाच्या पोस्टमधून धमकी देणे, चित्रा वाघ यांच्याकडून माध्यमातून धमक्या देण्यासारखे प्रकार घडत असल्याचे उर्फी जावेदने चाकणकरांना सांगितले. लवकरच आपण ऑनलाईन तक्रार करू, महिला आयोगाने कारवाईचे आदेश द्यावेत, अशी विनंतीही तिने केल्याचे सूत्रांनी सांगितले.

उर्फी जावेद नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या पोस्टची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होत असते. सध्या तिचे काही फोटोशूट कमालीचे चर्चेत आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com