Urfi Javed Controversy: 'ही कधीच सुधारणार नाही' उर्फी जावेदचा ड्रेस पाहून नेटकरी पुन्हा संतापले

कपड्यांसह उर्फीच्या मास्कने सुद्धा वेधले लोकांचे लक्ष.
Urfi Javed
Urfi JavedInstagram @urf7i
Published On

Urfi Javed New Look: सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद नेहमीच चर्चेत असते. उर्फीच्या अतरंगी ड्रेसिंग सेन्समुळे अनेकजण तिच्यावर टीका करत असतात. उर्फी तिच्या कामामुळे कमी आणि तिच्या बोल्ड आणि अनोख्या फॅशनमुळे चर्चेचा विषय बनते. उर्फी कुठेही गेली तरी सर्वांचे लक्ष आपोआप तिच्याकडे वेधले जाते. उर्फी सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. तिचे वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

उर्फी जावेद पुन्हा एकदा तिच्या नवीन लूकसह लोकांसमोर आली आहे. सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहे.

उर्फीने जाळीदार लांब स्कर्ट आणि पट्टीचा टॉप घातला होता. याशिवाय याच जाळीच्या कापडापासून तिने हातांसाठी हातमोजे बनवले आहेत. या सगळ्याशिवाय अजून एका गोष्टीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या कपड्यासह उर्फीने तिच्या चेहऱ्यासाठी मास्कही बनवला आहे. जी दिसायला खूप विचित्र दिसते.

Urfi Javed
Mithila Palkar Birthday: योगायोगाने अभिनेत्री बनली मिथिला पालकर, 'काव्या' बनून जिंकली चाहत्यांची मने

उर्फीच्या या नव्या कृतीमुळे सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. सोशल मीडिया यूजर्स तिची खिल्ली उडवत आहेत. उर्फी नेहमीप्रमाणे पूर्ण आत्मविश्वासाने सर्वांसमोर असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. उर्फीने काहीवेळा तिचा मास्क देखील काढून टाकला. युजरने यावरून उर्फीला खूप ट्रोल करत आहेत.

एका युजरने कमेंट करताना लिहिले, हिच्यात सुधारणा होणार नाही. दुसऱ्या यूजरने लिहिले की, सार्वजनिक ठिकाणी असे करू नये. तसेच आणखी एका युजरने लिहिले, पश्चात्ताप, पश्चात्ताप, संपूर्ण मूड खराब केला. सर्वात शेवटी एकाने लिहिले, आता ऍलर्जी होत नाही.

उर्फीसाठी अशा प्रकारे ट्रोल होणे काही नवीन नाही. याआधीही तिला अनेकदा लोकांच्या कटू शब्दांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळेच आता तिला या गोष्टींनी फरक पडत नाही.

गेले काही दिवस भाजप नेत्या चित्रा वाघ सुद्धा उर्फी विरोधात आक्रमक झाल्या होत्या. उर्फी आणि चित्रा वाघ यांचे सोशल मीडियावरील वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे. उर्फी विरोधात चित्रा वाघ यांनी पोलिस ठाण्यात आणि महिला आयोगाकडे तक्रार देखील दाखल केली आहे. उर्फीने सोशल मीडियावर चित्रा वाघ यांना डिवचण्याची एकही संधी सोडली नाही. वेगवेगळी विधाने करून उर्फी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधत होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com