Mithila Palkar
Mithila Palkar Instagram @mipalkarofficial

Mithila Palkar Birthday: योगायोगाने अभिनेत्री बनली मिथिला पालकर, 'काव्या' बनून जिंकली चाहत्यांची मने

मिथिलाने एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की ती योगायोगाने अभिनेत्री बनली आहे.
Published on

Mithila Palkar Birthday Special: मिथिला पालकरचा आज तिचा 30 वा वाढदिवस आहे. यानिमित्त तिचे चाहते तिच्यावर प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. मिथिलाचे लाखो चाहते तिला वाढदिवसाच्या वेगवेगळ्या प्रकारे शुभेच्छा देत आहेत. आज मिथिलाच्या वाढदिवशी जाणून घेऊया तिच्या आयुष्याशातील काही रंजक किस्से.

मिथिला पालकरचा जन्म 12 जानेवारी 1993 रोजी मुंबईतील एका मराठी कुटुंबात झाला. मिथिलाने तिच्या एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की ती योगायोगाने अभिनेत्री बनली आहे. मिथिलाच्या 'कन्फ्युजिंग थिंग्स फ्रॉम अ गर्ल' नावाचा यूट्यूब व्हिडिओ खूप लोकप्रिय झाला. त्यानंतर 2014 मध्ये 'माझा हनीमून' या मराठी लघुपटातून मिथिलाने अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले.

Mithila Palkar
Vijay Andalkar: 'पिंकीचा विजय असो' मालिका फेम अभिनेता विजय आंदळकर झाला 'बाबा'

2016 मध्ये 'गर्ल इन द सिटी' या यूट्यूब वेब सीरीजमधून मिथिलाला खूप प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत मिथिलाने २१ वर्षीय तरुणीची भूमिका साकारली होती, जिला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. 'गर्ल इन द सिटी'मधून प्रसिद्ध झाल्यानंतर मिथिलाला 'लिटिल थिंग्स' या दुसऱ्या वेब सीरीजमध्ये कास्ट करण्यात आले.

'लिटिल थिंग्स' या वेब सीरीजने या अभिनेत्रीचे नशीब बदलले. या वेब सीरीजमध्ये मिथिला ध्रुव सहगलसोबत दिसली होती. ध्रुव आणि काव्याच्या या जोडीने प्रेक्षकांची मने जिंकली. ही वेब सीरीज तरुण प्रेक्षकांमध्ये इतकी आवडली की या वेब सीरीजचे एकूण 4 सीझन आले आहेत.

2015 मध्ये मिथिलाने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. मिथिला पहिल्यांदा कंगना रनौत आणि इम्रान खान यांच्या 'कट्टी बट्टी' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात मिथिलाने इम्रान खानच्या बहिणीची भूमिका साकारली होती. यानंतर मिथिला इरफान खान, दुल्कर सलमानसोबत 'कारवां', अभय देओलसोबत 'चॉपस्टिक' आणि काजोल आणि रेणुका सहाणेसोबत 'त्रिभंगा' या चित्रपटांमध्ये दिसली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com