Kapil Sharma saam Tv
मनोरंजन बातम्या

The Kapil Sharma Show : 'द कपिल शर्मा शो'च्या नव्या सीझनमधून 'हा' कॉमेडियन घेणार एक्झिट, काय आहे नेमकं कारण?

'द कपिल शर्मा शो' पुन्हा सुरू होण्याची बातमी ऐकून चाहते खूप उत्सुक आहेत. परंतु या शोमधून आणखी एका कॉमेडीयनने एक्झिट घेतली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : टीव्हीवरील प्रसिद्ध कॉमेडी शो ज्याची प्रेक्षकांपासून सेलिब्रिटीपर्यंत सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत असा घराघरांत हास्याची लाट आणणारा शो म्हणजे 'द कपिल शर्मा शो'(The Kapil Sharma Show). या शोचा नवा सीझन लवकरच सुरू होणार आहे. कपिल शर्माचा हा शो सप्टेंबर महिन्याच्या मध्यात सोनी वाहिनीवर प्रसारित होऊ शकतो. तथापि, निर्मात्यांनी अद्याप शोच्या तारखेची अधिकृत घोषणा केलेली नाही. 'द कपिल शर्मा शो' पुन्हा सुरू होण्याची बातमी ऐकून चाहते खूप उत्सुक आहेत. परंतु या शोमधून आणखी एका कॉमेडीयनने एक्झिट घेतली आहे.

'द कपिल शर्मा शो'च्या नव्या सीझनमध्ये कॉमेडियन कृष्णा अभिषेक(Krushna Abhishek) दिसणार नाही. द कपिल शर्मा शोच्या नवीन सीझनमध्ये कृष्णा नाही त्याला काही कराराविषयक अडचणींचे कारण सांगितले जात आहे. शोच्या सीझनमध्ये निर्मात्यांनी अनेक बदल केले असून, पुन्हा एकदा सेलेब्स शोमध्ये एका नव्या लूकमध्ये दिसणार असल्याचे बोलले जात आहे.

'द कपिल शर्मा शो'चा मागील सीझन यावर्षी जूनमध्ये संपला होता. याचे कारण म्हणजे कपिल त्याच्या संपूर्ण टीमसोबत कॅनडा दौऱ्यावर जाणार होता. या दौऱ्यात कृष्णा अभिषेकही कपिलसोबत होता. टीम पुन्हा भारतात परतली आणि आता शोच्या नवीन सीझनची तयारी सुरू आहे. दरम्यान, कृष्णा आता या शोचा भाग नसल्याचे वृत्त समोर येत आहे. शोमध्ये निर्मात्यांनी कृष्णाला मानधन वाढवून न दिल्यामुळे त्याने हा शो सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचेही सांगितले जात आहे. त्याचबरोबर प्रसिद्ध कॉमेडीयन भारती सिंग देखील या शोचा भाग नसणार आहे. सध्या भारती टीव्हीवर एका सिंगिंग रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन करत असून त्यानंतर ती तिच्या इतर प्रोजेक्टमध्ये व्यग्र होणार असल्याचे बोलले जात आहे.

अर्चना पूरण सिंहने सर्वप्रथम चाहत्यांना 'कपिल शर्मा शो'च्या नव्या सीझनची माहिती दिली होती. २ दिवसांपूर्वी तिने तिच्या इन्स्टाग्राम हॅंडलवर एक व्हिडिओ शेअर करून ती नवीन सीझनच्या प्रोमो शूटसाठी जात असल्याचे सांगितले होते. या व्हिडिओमध्ये अर्चनाने शोच्या सेटची झलकही दाखवली जिथे प्रोमो शूट केला जात होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chai Masala Powder : चहाचा स्पेशल मसाला घरी कसा बनवायचा?

Devendra Fadnavis: आता एकही चूक खपवून घेतली जाणार नाही; CM फडणवीसांचा मंत्र्यांना सज्जड दम|VIDEO

Bhandara : शाळेत जाताना विद्यार्थिनीवर काळाची झडप; चिखलात सायकल स्लिप होताच ट्रॅक्टरची धडक, विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

Nagpur Food : नागपूरच्या अशा Top 8 डीशेस ज्या पाहताच तोंडाला सुटेल पाणी

Kolhapuri Chappal: सहज ओळखता येणार कोल्हापुरी; कोणी-कुठे बनवली चप्पल तेही कळणार

SCROLL FOR NEXT