Sonali Phogat: कोण होत्या सोनाली फोगाट? असा होता टिक-टॉक स्टार ते राजकारणा पर्यंतचा प्रवास

टिकटॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगट यांचे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
Sonali Phogat
Sonali PhogatSaam Tv

Sonali Phogat Dies: टिकटॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगट (Sonali Phogat) यांचे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झाले. त्यांचे भाऊ वतन ढाका यांनी याबाबत पुष्टी केली आहे. सोनाली यांच्या मृत्यूची माहिती मिळताच त्यांचे कुटुंबीय गोव्याला रवाना झाले आहे. निधनाच्या काही तासांअगोदरच त्यांनी त्याच्या इन्स्टाग्रामवर त्यांचे फोटोज शेयर केले होते, तसेच ट्विटरवरचा प्रोफाईल फोटोही बदलला होता.

टिक-टॉक स्टार (Tik Tok Star) म्हणून त्यांना ओळखलं जायचं. सोनाली फोगट यांनी 2019 हरियाणा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर आदमपूरमधून विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी कुलदीप बिश्नोई यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती, ज्यात त्यांचा पराभव झाला होता. गेल्या आठवड्यात कुलदीप बिश्नोई यांनीही त्यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

हे देखील पाहा -

कोण आहे सोनाली फोगट?

सोनाली फोगट यांचा जन्म 21 सप्टेंबर 1979 रोजी हरियाणातील फतेहाबाद येथे झाला. सोनाली यांचा प्रवास चढ-उतारांनी भरलेला आहे. सोनाली यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात 2006 मध्ये हिसार दूरदर्शनमध्ये अँकरिंगपासून केली होती. दोन वर्षांनी म्हणजे 2008 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.सोनाली यांनी पंजाबी आणि हरियाणवी चित्रपट, म्युझिक व्हिडिओ केले होते. २०१९ मध्ये, त्यांनी चोरियां चोर से कम नहीं होती या चित्रपटात काम केले. हा त्यांचा पहिला चित्रपट होता.

सोनाली टिकटॉकवर खूप सक्रिय होत्या. टिकटॉकवर त्यांना 1 लाख 32 हजार युजर्स फॉलो करत होते. दररोज त्या टिक टॉकवर अनेक नव-नवे व्हिडीओ बनवून पोस्ट करत होत्या. त्यांना टिक टॉक स्टार म्हणूनही ओळखलं जायचं.

Sonali Phogat
Rahul Dravid: आशिया चषकापूर्वीच भारतीय संघाला धक्का; राहुल द्रविडला कोरोनाची लागण

सोनाली फोगट या 2016 मध्ये प्रकाशझोतात आल्या जेव्हा त्याचे पती संजय यांचा मृत्यू झाला. सोनाली त्यावेळी मुंबईत होत्या. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आदमपूरमधून सोनाली फोगट यांना तिकीट दिले होते. यात त्यांचा पराभव झाला होता.

2020 मध्ये सोनाली फोगट यांचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये सोनाली या एका अधिकाऱ्याला चप्पलने मारताना दिसत होत्या. बिग बॉसच्या 14 व्या पर्वातही त्यांनी हजेरी लावली होती.

सोनाली यांनी ‘अम्मा’ या टीव्ही मालिकेत नवाब शाहच्या पत्नीची भूमिका साकारली होती. याशिवाय त्या ‘बंदुक आली जाटणी’ या हरियाणवी गाण्यातही त्या दिसल्या. त्यांनी ‘द स्टोरी ऑफ बदमाजगढ’ या वेब सीरिजमध्येही काम केलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com