Rahul Dravid: आशिया चषकापूर्वीच भारतीय संघाला धक्का; राहुल द्रविडला कोरोनाची लागण

आशिया चषक 2022 ही स्पर्धा अगदी तोंडावर आली असतानाच भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला कोरोनाची लागण.
Rahul Dravid Test COVID-19 Positive
Rahul Dravid Test COVID-19 PositiveSaam TV
Published On

मुंबई: आशिया चषक 2022 ही स्पर्धा अगदी तोंडावर आली असतानाच भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला (Rahul Dravid) कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे येत्या 27 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या आशिया चषकाला (Asia Cup 2022) राहुल मुकण्याची शक्यता आहे.

तर कोरोनामुळे (Corona) मुख्य प्रशिक्षकच षकासाठी जाऊ शकला नाही तर हा भारतीय संघासाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. शिवाय राहिल द्रविडला कोरोना लागण झाल्यामुळे भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी व्हीव्हीएस लक्ष्मणकडं (VVS Laxman) सोपवली जाण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत भारतीय संघ पहिला सामना पाकिस्तानसोबत खेळला जाणार आहे.

पाहा व्हिडीओ -

मात्र, स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच मुख्य प्रशिक्षक असलेल्या द्रविडला कोरोना लागण झाल्याने टीम इंडियासाठी (Team India) हा मोठा झटका बसला आहे. शिवाय आधीच भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतीच्या कारणामुळे संघातून बाहेर पडले आहेत. अशात आता संघाचा मुख्य प्रशिक्षक कोरोनाच्या कारणामुळे आशिया चषकात उपस्थित राहू शकला नाही, तर टीम इंडियाला मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Edited By - Jagdish Patill

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com