Famous Actor Death SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Actor Death : प्रसिद्ध अभिनेत्याचे भीषण कार अपघातात निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

Famous Actor Passed Away : प्रसिद्ध अभिनेत्याचे कार अपघतात निधन झाले. मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली. नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

प्रसिद्ध अभिनेत्याचे कार अपघातात निधन

वयाच्या ३१ व्या वर्षी अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास

मनोरंजन विश्वावर शोककळा

मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास आऊटर रिंग रोडवरील (ORR) एक्झिट १२ जवळील बेंगलुरु येथे एका भीषण रस्ते अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका टॉलिवूड अभिनेत्याचा आणि एका कॅमेरामनचा समावेश आहे. ते प्रवास करत असलेल्या कारने समोरून जाणाऱ्या एका ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.

TOI च्या वृत्तानुसार, आदिबाटला पोलिसांनी सांगितले की, टॉलीवूड अभिनेत्याचे नाव भारत कांत असे आहे. तो ३१ वर्षांचा होता. तर त्रिलोक असे कॅमेरामनचे नाव आहे. अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा आघात इतका तीव्र होता की, त्यांची कार पूर्णपणे चक्काचूर झाली होती. आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून हैदराबादकडे परतत असताना हा अपघात घडला. या दोघांनी शनिवारी रात्री आपला प्रवास सुरू केला होता. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास त्यांनी पेद्दाम्बरपेट येथून ORR वर प्रवेश केला आणि ते शमशाबादच्या दिशेने निघाले होते. हे दोघेही नानकरामगुडा येथे वास्तव्यास होते. मृतांचे मोबाईल फोन आणि त्यांच्या वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर या आधारे पोलिसांनी त्यांची ओळख पटवली.

तेलुगू अभिनेते आणि कंटेंट क्रिएटर के. भरत कांत यांचे ११ मे २०२६ रोजी एका भीषण कार अपघातात निधन झाले. भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळेच हा अपघात घडला असावा, असा पोलिसांना संशय आहे. अभिनेत्याच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच अभिनेत्यावर कलाकार आणि चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत.

भारत कांत करिअर

भरत कांत (Bharath Kanth) हा टॉलिवूडच्या मुख्य अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. टॉलिवूडमध्ये आपले करिअर घडवण्यासाठी दोघेही हैदराबादमध्ये आले होते. अभिनेत्याने तेलुगू आणि हिंदी वेब सीरिजमध्येही काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT