Famous Photographer Death saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Photographer Death : प्रसिद्ध छायाचित्रकार काळाच्या पडद्याआड; दीर्घकालीन आजाराने निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

Famous Photographer Passed Away : दिग्गज छायाचित्रकाराचे निधन झाले. वयाच्या ८३ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. छायाचित्रकाराविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Shreya Maskar

प्रसिद्ध छायाचित्रकाराचे निधन झाले.

वयाच्या ८३ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दीर्घकालीन आजाराने छायाचित्रकाराचे निधन झाले.

कला क्षेत्रातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध छायाचित्रकाराचे निधन झाले. भारतातील अत्यंत गौरवशाली छायाचित्रकारांपैकी एक असलेले रघु राय यांचे रविवारी पहाटे एका एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. वयाच्या ८३ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आपल्या कॅमेरात सुंदर दृश्य टिपली आहेत.

PTI च्या वृत्तानुसार, "दोन वर्षांपूर्वी वडिलांना प्रोस्टेट कॅन्सरचे निदान झाले होते, परंतु त्यावर उपचार होऊन ते बरे झाले होते. त्यानंतर हा आजार पोटात पसरला, त्यावरही यशस्वी उपचार झाले. अलीकडेच, कॅन्सर त्यांच्या मेंदूपर्यंत पसरला आणि त्यासोबतच वयोमानानुसार उद्भवणाऱ्या इतर समस्याही त्यांना भेडसावत होत्या..." असे छायाचित्रकार आणि राय यांचे पुत्र नितीन राय यांनी 'पीटीआय'ला सांगितले.

रघु राय यांच्या पश्चात त्यांची पत्नी गुरमीत, मुलगा नितीन आणि मुली लगन, अवनी आणि पुरवाई असा परिवार आहे. त्यांच्यावर रविवारी दुपारी ४ वाजता लोधी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील. रघु राय यांच्या निधनाची बातमी समजताच सर्व क्षेत्रातील कलाकारांनी, त्यांच्या मित्रमंडळींनी, चाहत्यांनी, कुटुंबानी आणि सर्वसामान्यांनी त्यांच्यावर श्रद्धांजली वाहिली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, १८ डिसेंबर १९४२ रोजी पंजाबमधील झांग (सध्या पाकिस्तानात) येथे जन्मलेले राय यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले होते. वयाच्या २३ व्या वर्षी त्यांनी छायाचित्रण क्षेत्रात पदार्पण केले आणि १९६६ मध्ये 'द स्टेट्समन' (The Statesman) या वृत्तपत्रात मुख्य छायाचित्रकार म्हणून रुजू झाले.हेन्री कार्टियर-ब्रेसन यांचे शिष्य असलेल्या या छायाचित्रकाराने आधुनिक भारताच्या इतिहासातील काही अत्यंत हृदयद्रावक घटना आपल्या कॅमेरात कैद केल्या. यामध्ये १९७२ मधील बांगलादेश निर्वासित संकट आणि १९८४ मधील भोपाळ वायू दुर्घटना यांसारख्या घटनांचा समावेश आहे. त्यांनी इंदिरा गांधी, दलाई लामा, मदर तेरेसा, सत्यजित राय, हरिप्रसाद चौरसिया आणि बिस्मिल्ला खान यांसारख्या दिग्गज व्यक्तींच्या पोर्ट्रेट्सच्या माध्यमातून भारताचे सामाजिक, राजकीय आणि आध्यात्मिक पैलूही टिपले.

रघु राय यांनी ब्लॅक अँड व्हाईट छायाचित्रांच्या माध्यमातून अगदी साध्या गोष्टींनाही असाधारण रूप दिले. राय यांनी 'संडे' आणि 'इंडिया टुडे' यांसारख्या भारतातील अग्रगण्य मासिकांसोबत काम केले. गेल्या काही वर्षांत त्यांचे छायाचित्र, फोटोज-निबंध 'टाइम', 'लाईफ', 'द न्यूयॉर्क टाइम्स', 'द इंडिपेंडंट' आणि 'द न्यू यॉर्कर' यांसारख्या जगप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय प्रकाशनांमध्ये प्रकाशित झाले.

१९७२ मध्ये राय यांना 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 'नॅशनल जिओग्राफिक'मध्ये प्रकाशित झालेल्या, 'ह्युमन मॅनेजमेंट ऑफ वाइल्डलाईफ इन इंडिया' या त्यांच्या छायाचित्र-निबंधासाठी त्यांना अमेरिकेत 'छायाचित्रकार ऑफ द इयर'पुरस्कारही प्राप्त झाला.२००९ मध्ये फ्रान्स सरकारने त्यांना 'ऑफिसिएर देस आर्ट्स एत देस लेट्रेस' या सन्मानाने विभूषित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची प्रकृती खालावली, तातडीने रुग्णालयात दाखल; पक्षातील नेते भेटीसाठी हॉस्पिटलमध्ये उपस्थित

Good News: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अवकाळी अन् हवामान बदलाच्या नुकसानीची भरपाई मिळणार; सरकारची मोठी घोषणा

Soaked Raisins Benefits: रोज सकाळी ५ भिजवलेले मनुके खा; शरीराला मिळतील हे 7 जबरदस्त आरोग्यदायी फायदे

Sunday Horoscope : अडचणीतून सहज सुटाल, ५ राशींच्या व्यक्तींना अचानक होणार धनलाभ; वाचा उद्याचे राशीभविष्य

Influencer Arrested: व्ह्यूजसाठी प्रसिद्ध युट्यूबचं महिलांसोबत धक्कादायक कृत्य; व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी दाखवला इंगा

SCROLL FOR NEXT