Kannada television actress Nandini CM, whose sudden death has shocked the entertainment industry. saam tv
मनोरंजन बातम्या

Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्री नंदिनी सीएमची आत्महत्या; मनोरंजन क्षेत्रात खळबळ

Kannada TV Actress Nandini CM Found Dead: कन्नड अभिनेत्री नंदिनी सीएमनं टोकाचा निर्णय घेत आयुष्य संपवलं. वृत्तानुसार अभिनेत्री नंदिनीच्या एका मित्राने टीव्ही 9 कन्नडला सांगितले की, अभिनेत्री नैराश्याने ग्रासलेली होती.

Bharat Jadhav

  • कन्नड टेलिव्हिजन अभिनेत्री नंदिनी सीएम यांची आत्महत्या

  • अभिनेत्री नैराश्याने त्रस्त असल्याचा दावा

  • केंगेरी पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद

मनोरंजन क्षेत्रातील धक्कादायक बातमी आहे. कन्नड टेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्री नंदिनी सीएमने आत्महत्या केली. वृत्तानुसार, अभिनेत्रीने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तिने एक सुसाईड नोट लिहिली असून त्यात तिने आत्महत्या करण्याचं धक्कादायक कारण सांगितलंय. केंगेरी पोलिस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

अभिनेत्री नंदिनी सीएमने कन्नड टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये आपलं नाव कमावलं होतं. तमिळ मालिका 'गौरी सीरियल' मध्ये दुहेरी भूमिका साकारली होती. २८ डिसेंबरच्या रात्री नंदिनी सीएमने बेंगळुरूच्या केंगेरी पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या एका पीजीमध्ये आत्महत्या केली. तिने "जीवा हुवागा," "निनादे ना," "संघर्ष," "मधुमगलू," आणि "अण्णा-ठंगी" सारख्या मालिकांमध्ये काम केले होते. दरम्यान अभिनेत्रीने आत्महत्या का केली त्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाहीये.

दरम्यान अभिनेत्री नंदिनीच्या जवळची मैत्रिण तनुजा हिने टीव्ही 9 कन्नडशी बोलताना सांगितले की, "मला तिच्या आत्महत्येचं खरे कारण माहित नाही. तिच्या वडिलांचे निधन झाले होते. तिच्या वडिलांच्या निधनानंतर नंदिनीला त्यांच्या जागी सरकारी नोकरी मिळाली होती. पण नंदिनीला ती नोकरी करायची नव्हती. अभिनय क्षेत्रात तिने १० वर्षे कठोर परिश्रम केले.

म्हणून तिला सरकारी नोकरी करू नका, असे सांगितले जात होतं. तर तिच्या कुटुंबाने तिला सरकारी नोकरी करण्याचा सल्ला दिला होता. तिच्या कुटुंबाने तिला चित्रपट क्षेत्रात जाऊ नका असे देखील सांगितले होतं. त्याचकारणामुळे ती नैराश्यात गेली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Surya Gochar 2026: सूर्याचं बॅक टू बॅक 3 वेळा संक्रमण; फेब्रुवारी महिन्यात 'या' 5 राशींचं नशीब पालटणार

पालघरमध्ये तारेच्या कुंपणात बिबट्या अडकला, परिसरात भीतीचं वातावरण, VIDEO

Shirdi Sai Baba : शिर्डीत साई बाबांना तब्बल 1 कोटींचा सुवर्ण मुकूट, video

भाजपच्या पाठिंब्यामुळे शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; कुणी कोणावर आरोप केले? वाचा

वंदे भारत स्लीपर आणि अमृत भारत ट्रेनचं तिकीट रद्द करायचंय? जाणून घ्या रेल्वेचे नियम,नाहीतर होईल नुकसान

SCROLL FOR NEXT