Case No. 73: मुखवट्यामागचं गूढ उलगडणार! थरारक रहस्यकथेने सज्ज 'केस नं. ७३' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Case No. 73 Marathi Movie: ना चेहरा, ना निमित्त, चार खून आणि शून्य पुरावे… ‘केस नं. ७३’ हा रहस्य व थराराने भरलेला नवा मराठी चित्रपट जानेवारीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Case No. 73
Case No. 73
Published On

Case No. 73 Marathi Movie: प्रत्येक माणूस समाजात वावरताना एखादा तरी मुखवटा घालूनच जगत असतो. त्या मुखवट्यामागे दडलेली असतात वेदना, सुख-दुःख, भीती, राग आणि अनेक न उलगडलेली रहस्ये. हा मुखवटा जेव्हा गळून पडतो, तेव्हा समोर येणारा खरा चेहरा अनेकांना चक्रावून टाकतो. अशीच गूढ, थरारक आणि विचारांना हादरवणारी कथा घेऊन येत आहे आगामी मराठी चित्रपट ‘केस नं. ७३’.

“ना चेहरा, ना निमित्त, चार खून, शून्य पुरावे…” या भारदस्त टॅगलाईनसह प्रदर्शित झालेलं या चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण करतं. कोण आहे खुनी? खुनामागचं कारण काय? आणि पुरावे नसताना सत्य उघडकीस कसं येणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रवास म्हणजे ‘केस नं. ७३’.

Case No. 73
Jabrat: हिंदवी पाटील–सुरेखा कुडची यांची ठसकेबाज जुगलबंदी; 'जब्राट'मध्ये रंगणार लावणीचा फड

लायलॅक मोशन पिक्चर्स आणि डस्क स्टुडिओज निर्मित हा रहस्यपट नवीन वर्षात, जानेवारी महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी केलं असून त्यांनीच शर्वरी सतीश वटक यांच्यासोबत चित्रपटाची निर्मितीही केली आहे. सहनिर्माते म्हणून प्रविण अरुण खंगार यांचा सहभाग आहे.

Case No. 73
Akshaye Khanna: 'सनकी, सर्वांचा अपमान करतो...'; 'या' दिग्दर्शकाने अक्षय खन्नावर केले गंभीर आरोप, म्हणाला...

या चित्रपटात अशोक शिंदे, राजसी भावे, शैलेश दातार, नंदिता पाटकर आणि पियुष आपटे यांची प्रभावी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. कथानकातील प्रत्येक प्रसंग नवं गूढ उलगडतो, तर प्रत्येक उत्तरामागे आणखी खोल आणि गुंतागुंतीचे प्रश्न उभे राहतात, ही या चित्रपटाची खासियत आहे.

दिग्दर्शक डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांच्या मते, ‘केस नं. ७३’ हा केवळ रहस्यपट नसून तो प्रेक्षकांच्या विचारसरणीला आव्हान देणारा अनुभव आहे. प्रत्येक प्रेक्षक या कथेत स्वतःचं वेगळं सत्य शोधेल. निर्मातेही हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीतील रहस्यपटांचा दर्जा उंचावेल, असा विश्वास व्यक्त करतात.

चित्रपटाची पटकथा डॉ. ऋचा अमित येनुरकर यांनी लिहिली असून गीतलेखन मंदार चोळकर यांचं आहे. अमेय मोहन कडू यांनी संगीत व पार्श्वसंगीताची जबाबदारी सांभाळली आहे, तर छायांकन निनाद गोसावी यांचं आहे. रहस्य, थरार आणि अनपेक्षित वळणांनी भरलेला ‘केस नं. ७३’ नेमका कोणाचा मुखवटा उतरवणार, हे पाहणं प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्कंठावर्धक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com