Comedian star Raju Srivastava Saam TV
मनोरंजन बातम्या

Raju Srivastava Health Update : राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीबाबत पुन्हा आली मोठी अपडेट, कुटुंबीय म्हणाले...

प्रसिद्ध कॉमेडीयन राजू श्रीवास्तव याची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयात दाखल झाल्यापासून त्याचे चाहते आणि कुटुंबीय सोशल मीडियावर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी सतत प्रार्थना करत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Raju Srivastava Health Update | मुंबई : प्रसिद्ध कॉमेडीयन राजू श्रीवास्तव(Raju Srivastava) याची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयात दाखल झाल्यापासून त्याचे चाहते आणि कुटुंबीय सोशल मीडियावर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी सतत प्रार्थना करत आहेत. आता कॉमेडियन राजू श्रीवास्तवचे कुटुंब एम्स रुगणालयाच्या जवळील गुरुद्वारात प्रार्थना करण्यासाठी गेले. राजूचे कुटुंबीय त्याच्या प्रकृतीशी संबंधित सर्व अपडेट्स सोशल मीडियावर(Social Media) त्याच्या चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. सध्या राजूच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा नाही. त्यांना एम्स रुग्णालयात अद्यापही व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

वृत्तानुसार, राजू श्रीवास्तव यांचा भाऊ काजू श्रीवास्तव यांचा मेहुणा प्रशांतने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, राजू श्रीवास्तवचे संपूर्ण कुटुंब एम्स रुग्णालयामध्ये आहे. त्याच्या प्रकृतीत अद्याप कोणतीही सुधारणा झालेली नाही. कालप्रमाणे आजही राजूची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जण त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. प्रशांतने सांगितले की, आज सकाळी त्याचे संपूर्ण कुटुंब गुरुद्वारामध्ये गेले होते. राजूची प्रकृती सुधारावी म्हणून त्याचे कुटुंब प्रार्थना करण्यासाठी गुरुद्वारामध्ये गेले होते.

इतकंच नाही तर राजूबद्दल बोलताना प्रशांत पुढे म्हणाला की, राजू भाई हे आपल्या सर्वांचे लाडके कलाकार आहेत. देशभरात लाखो लोक त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. काल त्याच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाने दिली होती. पण, त्यानंतर पुन्हा त्याची प्रकृती बिघडली. राजू श्रीवास्तवचा भाऊ काजू देखील दिल्लीत आहे. पण अजूनही राजूच्या प्रकृतीबाबत त्याला कोणतीही माहिती नाही, असे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma:निवृत्तीच्या चर्चेदरम्यान रोहितचं वादळ; ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना धुतलं, झळकावलं ३३ वं शतक

वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतात आलेल्या २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंचा विनयभंग, आरोपीच्या मुसक्या आवळल्या

Heart Blockage Symptoms: छातीत सतत जळजळ होतेय? अ‍ॅसिडीटी नाही, तर रक्तवाहिन्या ब्लॉकेजचा धोका, वाचा लक्षणे आणि उपाय

Maharashtra Live News Update: नांदेड जिल्ह्यात तुफान पाऊस

BB19: 'वीकेंड का वार' मध्ये एक नाही तर दोन स्पर्धक पडणार बाहेर; या सदस्यांना करावा लागणार एविक्शनचा सामना

SCROLL FOR NEXT