Marathi Films : हिंदी चित्रपटांमुळं आमचा बळी जातोय; अभिनेता सुमीत राघवन का संतापला?

मराठी चित्रपटांना थिएटरमध्ये मोठ्या प्रमाणात स्क्रीन्स उपलब्ध होत नाहीत. याचवरून आता अभिनेता सुमीत राघवननं आपली नाराजी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.
Sumeet Raghavan
Sumeet RaghavanSaam Tv
Published On

मुंबई: सध्या मराठी चित्रपटसृष्टीला सुगीचे दिवस आले असले तरी, अनेकदा चित्रपट निर्मात्यांपासून ते कलाकारांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. सध्या अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट एकाचवेळी रीलीज झाले आहेत. मराठी चित्रपटांना थिएटरमध्ये मोठ्या प्रमाणात स्क्रीन्स उपलब्ध होत नाहीत. याचवरून आता अभिनेता सुमीत राघवननं आपली नाराजी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

Sumeet Raghavan
Tiger Shroff New Girlfriend : टायगर श्रॉफ आता 'या' मॅाडेलच्या प्रेमात, एक्स गर्लफ्रेंड दिशा पटानी समोर दिसते पानी कम चाय!

अभिनेता सुमीत राघवन (Sumeet Raghavan) हा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. सामाजिक, राजकीय अशा विविध घडामोडींवर तो बिनधास्तपणे आपली मते मांडत असतो. सर्वसामान्यांच्या समस्या असोत किंवा आपल्या सहकारी कलाकारांच्या अडचणी असोत तो नेहमी या मुद्द्यांवर परखड भूमिका घेतो.

मराठी चित्रपट आणि थिएटर्समध्ये स्क्रीन्सची उपलब्धता या मुद्द्यावर सुमीतनं आपलं मत मांडलं आहे. त्यानं ट्विटवर पोस्ट करत आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सुमीतची ही पोस्ट व्हायरल होत आहे. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर आमिर खानचा(Aamir khan) 'लाल सिंग चड्ढा' आणि अक्षय कुमारचा 'रक्षाबंधन' हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. मात्र सुमीत राघवन याचा अलीकडेच प्रदर्शित झालेला 'एकदा काय झालं' या चित्रपटाला थिएटरमध्ये स्क्रीन्स उपलब्ध होत नसल्याने त्याने नाराजी व्यक्त केली आहे.

Sumeet Raghavan
Koffee With Karan 7: दीपिका, कतरिनावर करण जोहर नाराज; कारण आलं समोर

सुमीत राघवनने ट्विटरवर पोस्ट लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. 'काल आमच्या चित्रपटावरच्या एका पोस्टमध्ये एक वाक्य लिहिलं होतं की, जिथे पिकतं, तिथे विकत नाही. आज एक आठवडा झाला. #EkdaKaayZala प्रदर्शित होऊन आणि मुबंईत जेमतेम ३ शोज आहेत, एक ठाण्याला आहे, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी एकही शो नाहीये. हिंदी चित्रपटांसाठी आमचा बळी जाताना दिसतोय, असं ट्विट सुमीतने केले आहे. त्यामुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

संगीतकार सलील कुलकर्णी आणि अमेय खोपकर यांनी देखील वारंवार मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नसल्याच्या मुद्द्यावर आपलं परखड मत मांडलं आहे. मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळवण्यासाठी आवाज उठवायला लागतो. लाल सिंग चड्ढा आणि अक्षय कुमारचा रक्षाबंधन या दोन बड्या कलाकारांचे चित्रपट सिनेमागृहांमध्ये आले असताना, मराठी सिनेमांचे शो अचानक कमी झाल्याचा आरोपही केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com