Atul Parchure Death Saam Tv
मनोरंजन बातम्या

Atul Parchure Death : प्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे काळाच्या पडद्याआड, वयाच्या ५७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Atul Parchure News: अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे.

Satish Kengar

मराठी सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. आपल्या अभिनयाने सतत लोकांना हसवणारे हरहुन्नरी अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं आहे. त्याने वयाच्या ५७ वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी आणि हिंदी सिनेविश्वार शोककळा पसरली आहे.

त्यांनी आजवर अनेक विनोदी मालिका आणि चित्रपटात काम केलं आहे. अतुल परचुरे यांना गेल्या वर्षी कॅन्सरची लागण झाल्याची बातमी समोर आली होती. त्यांनी स्वतः याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली होती.

मिळलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. ते कॅन्सर आजराशी झुंज देत होते. त्यावर उपचार घेत होते. यातच मधल्या काळात त्यांची प्रकृती स्थिर झाली होती.

यानंतर ते पुन्हा कामावरही रुजू झाले होते. सध्या सूर्याची पिल्ले या नाटकासाठी रिहर्सल करत होते. या नाटकासाठी ते खूप उत्सुक होते. या सगळ्यातच अतुल परचुरे यांच्या निधनाची बातमी आता समोर आली आहे.

चुकीच्या उपचारांमुळे परिस्थिती आणखीनच बिघडली

गेल्या वर्षी अतुल परचुरे यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यांना कॅन्सरची लागण झाली आहे. चुकीच्या उपचारांमुळे त्यांची प्रकृती आणखी खालावली. त्याच्या यकृतात 5 सेमीची गाठ झाली. त्याचवेळी ते कपिल शर्मा शोचा एक भाग होते. मात्र त्यांना आजारपणामुळे हा शो सोडावा लागला. तसेच आजारपणामुळे त्यांना कपिल शर्मासोबत अमेरिका टूरवरही जाता आलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी; आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त

Ethiopia Volcano: ज्वालामुखीत भस्म होणार जग? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतावर संकट?

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

SCROLL FOR NEXT