2021 हे वर्ष सिनेविश्वासाठी खूप वाईट गेले आहे. यावर्षी इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज स्टार्सनी जगाचा निरोप घेतला आहे. 2021 हे वर्ष संपण्यासाठी काही दिवस उरले आहेत. तिथेच सिनेमाच्या विश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि प्रसिद्ध कॉमेडियन मुश्ताक मर्चंट (Mushtaq Merchant) यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. मुश्ताक यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.
मुश्ताक मर्चंट यांनी आपल्या करिअरमध्ये 'सीता और गीता', 'हाथ की सफाई', 'जवानी दीवानी', 'शोले' आणि 'सागर' यांसारख्या चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. इतकेच नाही तर धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'शोले' चित्रपटात मुश्ताक यांनी एक नाही तर दोन भूमिका साकारल्या होत्या.
हे देखील पहा-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुश्ताक यांना मुंबईच्या ऑल इंडिया इंटर कॉलेजमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय त्यांनी अनेक पुरस्कार आपल्या नावावर केले होते. मुश्ताक मर्चंटयांना तीन वर्षांसाठी सर्वोत्कृष्ट लेखक आणि दिग्दर्शकाचा पुरस्कारही मिळाला आहे. एवढेच नाही तर अभिनयासोबतच त्यांनी 'प्यार का साया', 'लाड साब', 'सपने साजन के', 'गँग' यांसारख्या अनेक चित्रपटांच्या पटकथाही लिहिल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.