हल्ल्यानंतर रोहीणी खडसे व एकनाथ खडसे यांची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं हल्ल्याचं कारणं...

मुक्ताईनगरकडे येत असताना हा हल्ला करण्यात आला होता. हल्ल्यात त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली होती. या हल्ल्यावर रोहिणी खडसे यांनी प्राणघातक हल्ल्याचे आपबिती सांगितली आहे.
हल्ल्यानंतर रोहीणी खडसे व एकनाथ खडसे यांची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं हल्ल्याचं कारणं...
हल्ल्यानंतर रोहीणी खडसे व एकनाथ खडसे यांची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं हल्ल्याचं कारणं...Saam Tv
Published On

संजय महाजन

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्या गाडीवर काल अज्ञातांनी दगडफेक करत हल्ला केला होता. ते मुक्ताईनगरकडे येत असताना हा हल्ला करण्यात आला होता. हल्ल्यात त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली होती. या हल्ल्यावर रोहिणी खडसे यांनी प्राणघातक हल्ल्याचे आपबिती सांगितली आहे.

रोहिणी खडसे म्हणाल्या, घाबरवण्यासाठी माझ्यावर हल्ला केला, मात्र मी घाबरणार नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रोहिणी खडसे खेवलकर यांच्यावर काल रात्री प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यानंतर रोहिणी खडसे खेवलकर यांनी या हल्ल्याची आपबिती कथन केली आहे.

हे देखील पहा-

पुढे त्या म्हणाल्या, "तीन दुचाकीवरून सात जण आले यात तीन जण हे शिवसेनेचे पदाधिकारी होते एकाच्या हातात पिस्तूल, दुसर्‍याच्या हातात तलवार तर तिसऱ्या च्या हातात लोखंडी रॉड होता. मी कारमध्ये बसलेल्या बाजूने तिघे आले. एकाने माझ्यावर पिस्तूल रोखले व कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजा उघडला नाही म्हणून हातात रॉड असलेल्या व्यक्तीने माझ्या जोराने हल्ला चढविला."

'मलाच मारण्यासाठी हे तिघेजण आलेले असल्याचेही या वेळी रोहिणी खडसे म्हणाल्या. हा हल्ला मला घाबरविण्यासाठी होता मात्र मी या हल्ल्याने घाबरणारी नाही. मी महिलांच्या पाठीशी आहे. अशीच कायम उभी राहिल. बोदवड नगरपंचायतीत पासून सुरू असलेल्या राजकीय वैमनस्यातूनच वादातुन शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी हा हल्ला केला तर हल्ला करणार्‍यांची नावेही यावेळी रोहिणी खडसे खेवलकर यांनी सांगितली आहेत.

हल्ल्यानंतर रोहीणी खडसे व एकनाथ खडसे यांची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं हल्ल्याचं कारणं...
Breaking : राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला

दरम्यान, काल रात्री रोहिणी खडसे यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची तक्रार मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला आलेली आहे. या घटने चा तपास सुरु केला लवकरच तपासात सर्व काही समोर येईल. तसेच तक्रारीमध्ये आरोपींची नावे छोटू भोई, सुनील पाटील आणि पंकज कोळी ही आहेत, अशी पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे जळगाव यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com