Bhabiji Ghar Par Hai Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bhabiji Ghar Par Hai: 'भाबीजी घर पर हैं' मालिकेतील अभिनेत्री लवकरच आई होणार; Bold Photoshoot करत दिली गुडन्यूज

सोशल मीडियावर विदिशाने तिचे काही खास अंदाजातील फोटो पोस्ट केले आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bhabiji Ghar Par Hain fame Vidisha Srivastava pregnancy photoshoot: 'भाबीजी घर पर हैं' या मालिकेतील अभिनेत्री विदिशा श्रीवास्तव मागील काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रकाशझोतात आहे. सोशल मीडियावर विदिशा सक्रिय असते. तिचा मोठा चाहतावर्ग आहे. मालिकेतील विदिशाच्या गोरी मॅम अर्थाच अनिताच्या भूमिकेने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले.

विदिशा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा होत होत्या. फोटो पोस्ट करत विदिशाने या चर्चांना पुर्णविराम दिला आहे. विदिशा श्रीवास्तव जुलैमध्ये तिच्या बाळाच्या आगमनाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. सोशल मीडियावर विदिशाने तिचे काही खास अंदाजातील फोटो पोस्ट केले आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत विदिशाने ती प्रेग्नेंसीच्या शेवटच्या टप्प्यात असल्याचे सांगितलं आहे. विदिशाने बोल्ड मॅटर्निटी फोटोशूटमधील फोटो शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.(Entertainment Marathi News)

“मला असे फोटोशूट करायचे होते जे मला माझ्या प्रेग्नेसी दरम्यानच्या दिवसांना उजाळा देईल, म्हणूनच मी मॅटर्निटी फोटोशूट करण्याचे निवडले, काम हे आपल्याला नेहमीच करायचे आहे आणि मी मला शक्य होईल तोपर्यत ते करत राहणार आहे, प्रसूतीनंतर सुमारे एक महिन्यासाठी थोडा ब्रेक घेईन आणि शक्य तितक्या लवकर पुन्हा कामाला सुरूवात करेन', असे विदिशाने म्हटंले आहे

विदिशा मॅटर्निटि फोटोशूटमध्ये परिधान केलेल्या लाल रंगाच्या ड्रेसमध्ये अधिकच खुलून दिसते आहे. या फोटोमध्ये विदिशा बेबी बंप फ्लॉन्ट करताना बोल्ड अंदाजात दिसत आहे. सोशल मीडियावर विदिशाचे फोटो तूफान व्हायरल होत आहे. विदिशाच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. विदिशा श्रीवास्तवने डिसेंबर २०१८ मध्ये सायक पॉलसोबत लग्न केले. नुकतंच दोघांनी त्यांच्या चाहत्यांना गुड न्युज दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश अन् ३ महिन्यांचा अल्टीमेटम

शिवसेनेच्या मेळाव्यात असं काय घडलं? 'या' वक्त्याच्या भाषणाने ठाकरेंच्या डोळ्यांत आणलं पाणी

मी शिवसेना पक्षप्रमुखपद सोडायला तयार; शिवसैनिकांसमोरच उद्धव ठाकरेंचे मोठं विधान

'आमची पोरं कशाला पळवता? स्वतःच्या वांझोट्यापणावर उपचार करा'; शिवसेना पुन्हा फुटल्यावर ठाकरेंनी घेतला तिखट शब्दात समाचार

Maharashtra News Live Update: निवडणुकीआधी लाडकी बहीण.... आणि नंतर ८० लाख महिलांना अपात्र ठरवले. - उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT