Sunny Deol Watch Gadar: हिंदुस्तान झिंदाबाद है, था और रहेगा... चित्रपटगृहात पुन्हा दणाणला सनी देओल आवाज: व्हिडिओ व्हायरल

Sunny Deol Watch Movie With Fans: चित्रपटांच्या शोला सनी देओलने हजेरी लावून चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला आहे.
Sunny Deol Surprises His Fans
Sunny Deol Surprises His FansSaam TV
Published On

Sunny Deol Saying His Legendary Dialogue: सनी देओल-अमिषाचा 'गदर-एक प्रेम कथा' हा लोकप्रिय चित्रपट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. अमिषा पटेलचा आज वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसादिनी चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाला आहे. भारत-पाकिस्तान फाळणीनंतरच्या प्रेमकथेवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांना आजही तितकाच आवडत आहे.

२२ वर्षांनंतर पुन्हा गदर-एक प्रेमकथा या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 'गदर-एक प्रेम कथा' हा पुन्हा एकदा प्रदर्शित केला आहे. हा चित्रपट थोडा वेगळा असणार आहे.

यावेळी हा चित्रपट ४ केमध्ये दिसणार असून डॉबी साऊंड आणि व्हीएफएक्सचा देखील वापर करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये काही नवीन सीन्स पाहायला मिळणार आहेत. चित्रपटाचे शो हे मर्यादित आहेत. पण प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिल्यास शो वाढवण्यात येतील, असे सांगण्यात येत आहे. (Latest Entertainment News)

Sunny Deol Surprises His Fans
Bhojpuri Singer Arrested: संतापजनक! भोजपुरी गायकाचे अल्पवयीन मुलीवर अत्याचार, फोटो शेअर केल्यानंतर घटना उघडकीस

सनी देओलने चाहत्यांना दिलं सरप्राइज

आपल्या दमदार आवाजाने प्रेक्षकांमध्ये आपली छाप पाडणारा अभिनेता म्हणजे सनी देओल. सनी देओल हा नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. 'गदर-एक प्रेमकथा' हा चित्रपट पुन्हा एकदा रिलीज झाला आहे.

या चित्रपटांच्या शोला सनी देओलने हजेरी लावून चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला आहे. गदर रिलीज झाल्यावर दिल्लीला शो चालू होण्याआधी सनी देओलने शोला उपस्थित राहून प्रेक्षकांना सरप्राइज दिलं.

तारा सिंग-सकीनाच्या या लव्हस्टोरीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सिनेमागृहात गर्दी केली आहे. २२ वर्षानंतरही हा चित्रपट अजूनही तेवढाच प्रसिद्ध आहे.

Sunny Deol Surprises His Fans
Bigg Boss OTT: रफ्तारच्या रॅपवर सलमानचा स्वॅग; बिग बॉस ओटीटी 2 'Anthem Song' रिलीज

सनी देओलचा सिनेमागृहातील हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. सनी देओलच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी खूप प्रेम दिले आहे. सनी देओल "हिंदुस्तान झिंदाबाद है,झिंदाबाद था और झिंदाबाद रहेगा" हा लोकप्रिय डायलॉग बोलताना या व्हिडिओत दिसत आहे.

सनी दिल्लीनंतर जयपूरला आणि मुंबईला आपल्या प्रेक्षकांना सरप्राइज देण्यासाठी जाणार आहे. लोकांनी या चित्रपटाला खूप प्रेम दिलं होतं आणि आजही तितकचं प्रेम देत आहे.

गदर-२ लवकरचं चित्रपटगृहात

'गदर-एक प्रेम कथा' हा चित्रपट प्रेक्षकांनी पुन्हा एकदा डोक्यावर घेतला आहे. 'गदर २' हा चित्रपट ११ ऑगस्टला रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठीच गदर हा चित्रपट पुन्हा रिलीज केला आहे. सनी देओल-अमिषाला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक सज्ज झाला आहे. प्रेमाच्या सीमा ओलांडणाऱ्या सिनेमाच्या पुढच्या भागात काय असणार याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आतापासूनच आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com