Akshay kumar canva
मनोरंजन बातम्या

Akshay kumar new film:अक्षय कुमार पुन्हा घेऊन येतोय हॉरर कॉमेडी, Bhoot Bangla मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

Akshay kumar film: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने 'भूल भुलैया' या सिनेमाची माहिती चाहत्यांना ९ सप्टेंबर रोजी पोस्ट शेअर करत माहिती दिली. त्यामुळे कार्तिक आर्यनला अभिनयाची तोड द्यायला अक्षय कुमार घेऊन आलाय Bhoot Bangla.नक्की कारण काय? जाणून घ्या...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

akshay kumar vs kartik aaryan: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने 'भूल भुलैया' या चित्रपटानंतर जवळपास १४ वर्षांनी एक हॉरर फॅंटेसी असणारा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. या चित्रपटाची घोषणा येत्या ९ सप्टेंबरला होणार आहे. आता 'भूल भुलैया २' मधल्या कार्तिक आर्यनला प्रेक्षकांमध्ये त्याची जागा रोखून ठेवण्यासाठी स्पर्धा असणार आहेत. याच कारण म्हणजे बॉलिवूड स्टार अक्षय कुमारचा येणारा 'Bhoot Bangla' हा चित्रपट 'भुल भुलैया' चित्रपटाशी मिळता जुळता असणार आहे. त्यामुळे कार्तिक आर्यनला चाहता वर्ग टिकवून ठेवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.

Akshay kumar: बॉलिवुडच्या टॉप अ‍ॅक्टर्स येणारा अभिनेता अक्षय कुमार गेल्या ३३ वर्षांपासून फिल्म इंडस्ट्री काम करताना दिसतोय. प्रत्येक सिनेमात मुख्य भुमिका साकारणारा आणि तो सिनेमा हीट करणारा असा हा अभिनेता आहे. त्याची अ‍ॅक्टर्सचांगलीच तगडी आहे. अक्षय कुमारचे काही चित्रपट एका मागे एक फ्लॉप होत होते. त्यामुळे चाहतावर्ग त्याच्यावर नाराज झाला होता. त्यांनतर काही दिवसांनी तो त्याच्या कॉमेडी जॉनर मध्ये परतला तेव्हा पुन्हा चाहत्यांमध्ये त्याची वाहवाह झाली.

अक्षय कुमारने आता पर्यंत खूप मोठमोठ्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यातच १४ वर्षांपुर्वी त्याने दिग्दर्शक, प्रियदर्शन यांच्या सोबत काम केलं होतं. त्या सिनेमात हॉरर जॉनर होता. आता पुन्हा प्रियदर्शन सोबत तो काम करणार आहे. अक्षय कुमारने या आधी 'हेरा फेरी' , 'भागम भाग' , गरम मसाला' या चित्रटात यांच्या सोबत काम केलं होतं. याच दरम्यान त्यांच्या नव्या सिनेमाची चर्चा सोशल मिडियावर झाली आहे. या चित्रपटाचे नाव Bhoot Bangla असल्याची शक्यता होती. या चित्रपटाची कुठेही अनाउंसमेंट झालेली नव्हती.

अक्षय कुमारने ९ सप्टेंबर २०२४ ला त्याच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर त्याच्या इंस्टाग्राम हॅंडलवर एक मोशन पिक्चर शेअर केलं. त्यात भूत बंगला सिनेमाच नाव आहे. त्याच सोबत दिग्दर्शकने प्रियदर्शन यांनी केलं आहे. तब्बल चौदा वर्षांनी अक्षय कुमारचा पुन्हा त्याच्या जुन्या रुपात कम बॅक होताना दिसला आहे. हा चित्रपट २०२५ रोजी चित्रपट गृहात प्रदर्शित करणार आहेत. अशी माहिती त्या पोस्ट द्वारे अक्षय कुमारने शेअर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG New Rule: मोठी बातमी! केंद्र सरकारकडून LPG च्या नियमात मोठा बदल, 'या' नागरिकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचा पुन्हा आराखडा बदलला, लांबी वाढली; शेतकऱ्यांचा विरोध शमला

Maharashtra News Live Update: शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Paneer and Moong Chilla Recipe: प्रोटीनने भरपूर हेल्दी आणि टेस्टी नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर-मूग चीला

Mirchi Pakora Recipe : स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत मिरचीचे भजी कसं बनवाल? वाचा ५ मिनिटांत होणारी रेसिपी

SCROLL FOR NEXT