Actress Passes Away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actress Passes Away: एमी पुरस्कार विजेती प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन; वयाच्या ८७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Actress Passes Away: अमेरिकन टीव्ही मालिकेतील प्रतिष्ठित अभिनेत्री लोरेटा स्विट यांचे ३० मे २०२५ रोजी न्यूयॉर्क शहरातील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले.

Shruti Vilas Kadam

Actress Passes Away: अमेरिकन टीव्ही मालिकेतील प्रतिष्ठित अभिनेत्री लोरेटा स्विट यांचे ३० मे २०२५ रोजी न्यूयॉर्क शहरातील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्यांचे वय ८७ होते. त्यांच्या टिमने त्यांच्या निधनाची माहिती दिली असून, वृद्धापकाळाने त्यांने निधन झाले असल्याचे सांगितले आहे.

लोरेटा स्विट यांनी १९७२ ते १९८३ या काळात CBS वाहिनीवरील 'M*A*S*H' या मालिकेत मेजर मार्गारेट "हॉट लिप्स" हुलिहान ही भूमिका साकारली होती. त्यांनी या भूमिकेसाठी दोन एमी पुरस्कार मिळवले आणि चार वेळा गोल्डन ग्लोबसाठी नामांकन मिळवले. मालिकेच्या एकूण २५१ भागांपैकी त्यांनी २४० हून अधिक भागांमध्ये काम केले आहे.

लोरेटा स्विट यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९३७ रोजी न्यू जर्सीमध्ये झाला. त्यांनी अमेरिकन अकादमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्समध्ये अभिनयाचे शिक्षण घेतले आणि १९६० च्या दशकात टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले. त्यांनी 'Mission: Impossible', 'Gunsmoke', आणि 'Hawaii Five-O' यांसारख्या मालिकांमध्येही काम केले. त्यांनी 'Same Time, Next Year' आणि 'Mame' यांसारख्या ब्रॉडवे नाटकांमध्येही भूमिका साकारल्या.

अभिनयाच्या क्षेत्राबरोबरच, स्विट प्राणी कल्याणासाठीही सक्रिय होत्या. त्यांनी 'SwitHeart Animal Alliance' ही संस्था स्थापन केली आणि 'SwitHeart' नावाचे पुस्तक प्रकाशित केले, ज्यामध्ये त्यांच्या जलरंग चित्रकला आणि प्राणी संरक्षणावरील कार्याचा समावेश आहे. त्यांनी १९८३ ते १९९५ या कालावधीत अभिनेता डेनिस होलाहानशी विवाह केला होता.लोरेटा स्विट यांच्या निधनामुळे टेलिव्हिजन आणि थिएटर क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या अभिनयाने आणि सामाजिक कार्याने अनेकांना प्रेरणा दिली आहे.

मुंबई जिंकण्यासाठी महायुतीची रणनीती, भाजप-शिंदेसेनेला मलिक नको, मुस्लीम हवे?

राज्यात हाडं गोठवणारी थंडी, उत्तरेतील शीत लहरींमुळे राज्यात थंडीची लाट

IAS Promotion : 67 IAS अधिकाऱ्यांचं प्रमोशन, आता लवकरच होणार बदली, कोणाला मिळालं कोणतं पद?

नागपूर अधिवेशनातून मुंबईकरांना गिफ्ट, 20 हजार अनधिकृत इमारतींना 'अभय'

विधीमंडळातले राडेबाज, थेट कारावास, आव्हाड- पडळकर समर्थक अडचणीत|VIDEO

SCROLL FOR NEXT