बॉलिवूडच्या ‘पंगा गर्ल’ने (Kangana Ranaut) काल दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर ५० वर्षांचा इतिहास मोडत रावण दहन केले आहे. कंगना रनौतने ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला मान मिळालेला आहे. काल नवी दिल्लीच्या लाल किल्ला मैदानामध्ये ‘लव कुश रामलीला’ या कार्यक्रमामध्ये कंगनाच्या हस्ते रावण दहन करण्यात आले.
पण यावेळी सर्वाधिक चर्चा झाली ती एका घटनेची, सध्या त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये, कंगना रामलीला मैदानामध्ये पोहोचण्याआधी दहनासाठी तयार केलेला रावणाचा पुतळा खाली पडला. त्यामुळे सोशल मीडियावर तिची खिल्ली उडवली जात असून कंगनाला ट्रोल ही केलं जात आहे. पुन्हा रावणाचा उभारून त्याचे कंगनाने बाण मारुन दहन केले.
लाल किल्ल्यावर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रावण दहण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ५० वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एका महिलेने रावण दहन केले आहे अशी प्रतिक्रिया ‘लव कुश रामलीला’ समितीचे अध्यक्ष अर्जुन सिंह यांनी दिली.
सोशल मीडियावर कंगनाने तिचा दसरा स्पेशल लूक चाहत्यांसोबत शेअर केला होता. यावेळी फोटो शेअर करताना कंगनाने कॅप्शन दिले की, “आज मला दिल्लीतल्या प्रसिद्ध ‘लवकुश रामलीला’ कार्यक्रमामध्ये रावण दहन करण्याची संधी मिळाली. ज्याप्रमाणे प्रभू श्रीराम यांनी रावणासोबत युद्ध केले, त्याप्रमाणेच आपल्या देशाचे सैनिक राक्षसांसोबत लढतात. जय श्री राम”
दिल्लीच्या रावण दहणाच्या कार्यक्रमामध्ये, दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सेक्सेना, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबतच अभिनेत्री कंगना रणौतही हजर होती. कार्यक्रमाच्या ५० वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एका महिलेच्या हस्ते रावण दहन करण्यात आल्यामुळे या कार्यक्रमाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
कार्यक्रमामध्ये कंगना प्रतिक्रिया दिली आहे. कंगना कार्यक्रमामध्ये म्हणाली, “देशामध्ये सर्वात मोठे नायक श्री राम आहेत, त्यांच्या आधीही कोणी नाही आणि भविष्यात कोणी नसेल. त्यासोबतच ‘जय श्री राम आणि भारत माता की जय’ अशी घोषणा तिने दिली. सध्या अभिनेत्रीचे सर्वच स्तरावर कौतुक केले आहे.
कंगनाच्या कामाबद्दल सांगायचे तर, कंगनाचा येत्या शुक्रवारी ‘तेजस’ चित्रपट प्रदर्शित होणार असून चित्रपटामध्ये तिने भारतीय वायुसेनेतल्या पायलटचे पात्र साकारलेय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.