Big Update on Drishyam 3 Saam
मनोरंजन बातम्या

ठरलं तर मग! 'दृश्यम ३' लवकरच रिलीज होणार, दिग्दर्शकाने दिली मोठी अपडेट

Big Update on Drishyam 3: दृश्यम ३ चं चित्रीकरण पूर्ण झाले असून चित्रपट पोस्ट-प्रॉडक्शनमध्ये आहे. मोहनलाल अभिनीत मल्याळम वर्जन हिंदी वर्जनच्या आधी प्रदर्शित होणार.

Bhagyashree Kamble

बॉलिवूडमधील बहुप्रतिक्षित दृश्यम ३ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. तीन वर्षांपूर्वी दृश्यम २ प्रदर्शित झाला होता. दृश्यम आणि दृश्यम २ या दोन्ही चित्रपटांनी धुमाकूळ घातला होता. हा चित्रपट फक्त अभिनेता मोहनलालच्या कारकिर्दीतीलच नाही तर, अजय देवगणच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. सस्पेन्स आणि थ्रिलरने पुरेपूर या चित्रपटाचा तीसरा पार्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

अजय देवगणचा दृश्यम हा मोहनलाल अभिनीत मल्याळम चित्रपट दृश्यमचा रिमेक आहे. मोहनलालचा दृश्यम हा चित्रपट आधीच दोन भागात प्रदर्शित झाला होता. अजय देवगण यांचा दृश्यम देखील दोन भागात प्रदर्शित झाला होता. दरम्यन, पाच महिन्यांपूर्वी दृश्यम ३ चे शूटिंग स्वतंत्रपणे सुरू झाले होते. आता लवकरच हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होईल.

दृश्यम ३ चे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. चित्रपटाबाबत दिग्दर्शकाने एक मोठी अपडेट दिली आहे. दृश्यम ३ हिंदी आणि मल्याळम भाषेतील दोन्ही वर्जन पुढच्या वर्षी प्रदर्शित होईल. अजय देवगण अभिनीत हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण अद्याप सुरू झाले नाही. मात्र, मोहनलाल अभिनीत दृश्यम ३ चित्रपटाचे शूटिंग अंतिम टप्प्यात आहे.

मोहनलाल अभिनीत दृश्यम ३ चे दिग्दर्शक जीतू जोसेफ म्हणतात, 'हा चित्रपट सध्या पोस्ट प्रॉडक्शनमध्ये आहे. पुढील तीन ते चार महिन्यांत चित्रपट प्रदर्शित होईल. हा चित्रपट हिंदी वर्जनच्या पूर्वी रिलीज होईल'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईच्या महालक्ष्मी मंदिर परिसरात बेवारस बॅग सापडल्याने गोंधळ

बुरशी लागलेला कांदा खाताय, सावधान! कांद्यात जीवघेणं ब्लॅक फंगस?

येत्या २ महिन्यात राज्याचा CM बदलणार? महाराष्ट्रातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

भाजप- शिंदेसेनेचं पुन्हा फिस्कटणार? 13 महापालिकांवरून महायुतीत रस्सीखेच

Raigad : विद्यार्थिनी अलिबागहून महाडला स्पर्धेत आली, अचानक शाळेच्या मैदानात कोसळून मृत्यू

SCROLL FOR NEXT