Jackie Shroff Moves To Delhi High Court Over His Name Controversy Saam TV
मनोरंजन बातम्या

Jackie Shroff News: नाव आणि फोटोचा चुकीचा वापर, जॅकी श्रॉफची दिल्ली हायकोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?

Jackie Shroff Moves To Delhi High Court: 'भिडू' याच शब्दामुळे जॅकी श्रॉफने हायकोर्टात धाव घेतली आहे. खरंतर, जग्गूदादाने आपलं नाव, फोटो आणि आवाजाच्या बेकायदा वापराबद्दल याचिका दाखल केली आहे.

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. जॅकी यांची अवघ्या इंडस्ट्रीसोबतच चाहत्यांमध्ये जग्गू दादा अशी ओळख आहे. जग्गू दादाने आपल्या अभिनय आणि डायलॉगच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. आपण अनेकदा त्यांच्या तोंडून 'भिडू' हे नाव ऐकलंच असेल. त्यांच्या अनेक डायलॉग्जमध्ये 'भिडू' हा शब्द ऐकायला मिळतोच. मात्र आता 'भिडू' याच शब्दामुळे जॅकी श्रॉफने हायकोर्टात धाव घेतली आहे. खरंतर, जग्गूदादाने आपलं नाव, फोटो आणि आवाजाच्या बेकायदा वापराबद्दल याचिका दाखल केली आहे.

जग्गू दादाने आपल्या वैयक्तिक आणि कॉपी राइट अधिकारांच्या रक्षणासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात काही कंपन्यांविरोधात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी मंगळवारी (१४ मे) जॅकी श्रॉफच्या याचिकेवर सुनावणी केली. जग्गू दादांनी त्यांच्या वैयक्तिक व कॉपीराइट अधिकारांचे कोर्टाने रक्षण करावे, अशी मागणी कोर्टात केली आहे.

या संपूर्ण प्रकरणावर १५ मे रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. काही कंपन्यांसोबतच, सोशल मीडिया चॅनल्स, AI ॲप्स आणि GIF बनवणाऱ्या प्लॅटफॉर्मवर आपल्या परवानगीशिवाय, आपले नाव, आवाज, फोटो आणि त्यांच्यासंबंधित इतर गोष्टीचा वापर करू नये, असे आदेश न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी जग्गू दादाने याचिकेत केली आहे.

जॅकी श्रॉफच्या बाजूने न्यायालयात युक्तिवाद करणाऱ्या वकील प्रवीण आनंद यांनी सांगितले की, काही प्रकरणांमध्ये जॅकी यांचे फोटो आणि आवाजाचा वापर करून आक्षेपार्ह मीम्स बनवले जातात. काही प्रकरणांत जॅकी श्रॉफच्या फोटोचा वापर पोर्नोग्राफीमध्येही केला जात आहे.

यामुळे अभिनेत्याची विनाकारण बदनामी होत आहे. त्यामुळे अभिनेत्याने याचिकेत न्यायालयाला विनंती केली की, जॅकी श्रॉफ नावाव्यतिरिक्त त्यांना जॅकी, जग्गू दादा आणि भिडू या नावानेही संबोधले जाते. त्यामुळे ही सर्व नावे वापरण्या आधी त्याची परवानगी घ्यावी असे म्हटले आहे.

टेक्नोलॉजी विभाग, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला जॅकी श्रॉफ यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बेकायदेशीरपणे वापर करणाऱ्या वेबसाइट्स आणि लिंक्स काढून टाकण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंतीही याचिकेत करण्यात आली आहे. माझा आवाज, माझा फोटो आणि माझं नाव वापरल्याने माझ्या प्रतिमा डागळली जात असल्याचे जॅकी श्रॉफने म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गेमझोनच्या नावाखाली चालायचे भलतेच प्रकार; प्रायव्हेट रुममधील दृश्य पाहून पोलीसही चक्रावले

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा कौल कोणाला? भाऊ, भाई की दादाला?

महिंद्राची जबरदस्त Formula E -कार बाजारात; रेसिंग ट्रॅकवर धुरळा उडवणार

Maharashtra Live News Update: अकोला स्थानिक स्वराज निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मिळालं चिन्ह

अहंकारी रावणाची लंका खाक झाली, अहंकाराच्या लंकेवरुन शिंदे-फडणवीस भिडले

SCROLL FOR NEXT