Do Aur Do Pyaar And LSD 2 BO Collection Day 1 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Do Aur Do Pyaar आणि LSD 2 ची बॉक्स ऑफिसवर संथ गतीने सुरूवात, पहिल्या दिवशी केली तुटपुंजी कमाई

Do Aur Do Pyaar And LSD 2 Collection: नुकतंच बॉक्स ऑफिसवर ‘दो और दो प्यार’ आणि ‘लव्ह सेक्स और धोका २’ अशे दोन वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट रिलीज झालेले आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळतोय.

Chetan Bodke

Do Aur Do Pyaar And LSD 2 BO Collection Day 1

सध्या बॉक्स ऑफिसवर वेगवेगळ्या आशयाचे चित्रपट रिलीज होताना दिसत आहे. सध्या चाहत्यांमध्ये ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ (Bade Miyaan Chote Miyaan) आणि ‘मैदान’ (Maidan)ची क्रेझ पाहायला मिळत आहे. अशातच नुकतंच बॉक्स ऑफिसवर ‘दो और दो प्यार’ (Do Aur Do Pyaar) आणि ‘लव्ह सेक्स और धोका २’ (Love Sex Aur Dhokha 2) अशे दोन वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट रिलीज झालेले आहेत. याआधी रिलीज झालेल्या चित्रपटांना चाहत्यांनी दिलासादायक प्रतिसाद मिळाला होता.

‘दो और दो प्यार’ आणि ‘LSD 2’ला प्रेक्षकांनी कसा प्रतिसाद मिळणार, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. या दोन्हीही चित्रपटांना प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी, कसा प्रतिसाद मिळाला जाणून घेऊया... (Bollywood)

शिर्षा गुहा ठाकुरता दिग्दर्शित 'दो और दो प्यार'मध्ये विद्या बालन, प्रतीक गांधी, इलियाना डिक्रूझ आणि सेंथिल राममूर्ती मुख्य भूमिकेत आहेत. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर आधारित या चित्रपटाला समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असला तरी त्याला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातून विद्या बालनने फार मोठ्या गॅपनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले आहे.

चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त ५० लाखांचीच कमाई केलेली आहे. हा कमाईचा सर्वाधिक कमी आकडा असल्याचे दिसत आहे. निर्मात्यांकडून खास प्रेक्षकांसाठी एका तिकीटावर एक तिकीट फ्रीची ऑफरही देण्यात आलेली आहे. या ऑफरची विकेंडला कसा प्रतिसाद मिळतोय, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. (Bollywood Film)

तर ‘LSD 2’ बद्दल सांगायचे तर, दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित आणि एकता कपूर निर्मित ‘LSD 2’ चित्रपटही थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा पहिला भाग हिट झाल्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाचा दुसरा भाग रिलीज केला. चित्रपटाचे कथानक सोशल मीडियावरील प्रेम आणि फसवणूक यावर आधारित आहे. चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू असून प्रेक्षकांकडून चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी फक्त १५ लाखांचीच कमाई केलेली आहे. (Bollywood News)

यापूर्वी बॉक्स ऑफिसवर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि ‘मैदान’ हे दोन चित्रपट रिलीज झालेले आहेत. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ने एका आठवड्यात ५० कोटींची कमाई केलेली आहे. तर ‘मैदान’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एका आठवड्यात २९ कोटींची कमाई केलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT