Director Vivek Agnihotri on Star Kid Culture Reveals New Talent is Hard to Enter in Industry Saam Tv
मनोरंजन बातम्या

Star Kid Culture: आजच्या काळात कोणी शाहरुख खानला बॉलिवूडमध्ये एन्ट्री...; स्टार किड्सबद्दल 'या' दिग्दर्शकाने व्यक्त केली खंत

Star Kid Culture: विवेक अग्निहोत्री यांनी सांगितले की आजच्या काळात स्टार किड्समुळे कशी हानी पोहोचत आहे. 'काश्मीर फाइल्स' फेम चित्रपट निर्माते म्हणाले की स्टार्स आणि स्टुडिओने लेखकांचा दर्जा हिरावून घेतला आहे.

Shruti Vilas Kadam

Star Kid Culture: चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये लेखकांना कमी आणि स्टार किड्सना जास्त महत्त्व देण्यावर आपले मत उघडपणे मांडले. 'द काश्मीर फाइल्स' आणि 'द व्हॅक्सिन वॉर' सारखे चित्रपट बनवणारे विवेक अग्निहोत्री म्हणाले की, बॉलीवूडची दारे बंद करण्याची संस्कृती नवीन टैलेंटला संपवत आहेत. स्टार किड्सना महत्त्व देणे आणि नवीन टॅलेंटला संधी न देणे यामुळे खूप नुकसान होईल. बॉलिवूडचा सर्वात मोठा आउटसाईडर मानला जाणारा शाहरुख खानचे उदाहरण देऊन विवेक अग्निहोत्री यांनी आपला मुद्दा स्पष्ट केला.

सिद्धार्थ कन्ननशी झालेल्या संभाषणात विवेक अग्निहोत्री म्हणाले, "हे घडत आहे कारण इंडस्ट्रीत कोणतीही नवीन टॅलेंट येत नाही. कोणताही सामान्य माणूस आत प्रवेश करू शकत नाही." शाहरुख खानचे उदाहरण देताना विवेक म्हणाले की, जर आज त्याला चित्रपटसृष्टीत यायचे असते तर अस्खलित इंग्रजी आणि स्ट्राँग बॅकग्राउंडशिवाय तो स्टुडिओचाही दरवाजा ओलांडू शकला नसता. विवेकने अभिनयापेक्षा इंस्टाग्राम फॉलोअर्सच्या आधारे लोकांना निवडणे चुकीचे असल्याचे म्हटले आणि कानपूर, झाशी किंवा विशाखापट्टणममधील अभिनेता चित्रपट उद्योगात कसा प्रवेश करू शकेल असा प्रश्न विचारला.

स्टार्सनी लेखकांचा दर्जा हिसकावून घेतला आहे

विवेक अग्निहोत्री म्हणाले, " अधिकतर, निर्माते चित्रपट पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील मुलांना घेतात. त्यामुळे एक पणा चित्रपटात अधिक येतो आणि प्रेक्षक मग असे चित्रपट नाही पाहत. बॉलिवूडमध्ये लेखकांचे कौतुक होत नसल्याच्या मुद्द्यावर विवेक अग्निहोत्री म्हणाले, "लेखकांना कोणताही दर्जा नाही. स्टार्स आणि स्टुडिओने त्यांचा दर्जा हिसकावून घेतला आहे. त्यांनी एक सापळा रचला आहे.

स्टुडिओला संख्या हवी असते आणि त्यासाठी त्यांना स्टार्सची गरज असते. जिथे लेखकांना १० रुपये मिळतात, तिथे स्टार्सना १० हजार मिळतात." कोणताही सामान्य माणूस आत प्रवेश करू शकत नाही." शाहरुख खानचे उदाहरण देताना विवेक म्हणाले की, जर आज त्याला चित्रपटसृष्टीत यायचे असेल तर अस्खलित इंग्रजी आणि शक्तिशाली पार्श्वभूमीशिवाय तो स्टुडिओचा दरवाजा ओलांडू शकला नसता.

Raipur Steel plant : स्टील प्लांटमध्ये मोठी दुर्घटना; ६ कामगारांचा मृत्यू, अनेक जण दबल्याची भीती

Maharashtra Live News Update: पुण्यात रस्त्याच्या मागणीसाठी तीन गावातील गावकऱ्यांचे आमरण उपोषण

Amla For Hair: आवळ्याचा केसांवर कोणता परिणाम होतो?

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

SCROLL FOR NEXT