Sajid Khan : 'MeToo' मोहिमेची सुरुवात हॉलिवूडमधून झाली होती, मात्र या मोहिमेची आग बॉलिवूडपर्यंत पोहोचली आणि अनेक प्रसिद्ध स्टार्सवर असे आरोप झाले, जे ऐकल्यानंतर सगळेच थक्क झाले. एक प्रसिद्ध दिग्दर्शकही या मोहिमेचा बळी ठरला. जो गेल्या अनेक वर्षांपासून एका चित्रपटासाठी तळमळत आहे. हा दिग्दर्शक दुसरा तिसरा कोणी नसून साजिद खान आहे. साजिद खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, गेल्या 6 वर्षांत त्याने अनेकवेळा स्वत:चे जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे.
एका मुलाखतीत साजिद खानने याबाबत उघडपणे बोलले आहे. ज्यामध्ये साजिद खान म्हणाला की, 'गेल्या सहा वर्षांत मी अनेकदा आयुष्य संपवण्याचा विचार केला आहे.माझ्या आयुष्यातील हा सर्वात वाईट काळ होता. फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतरही मला 6 वर्षांपासून कोणतेही काम मिळाले नाही. मी या चित्रपटसृष्टीत 14 वर्षांपासून काम करत आहे. माझ्या वडिलांच्या पश्चात आम्ही सर्व भाऊ-बहिणी इथे काम करू लागलो. मी पुन्हा माझ्या पायावर उभा असल्याचे माझ्या आईला दिसले असते तर मला आनंद झाला असता. गेली 6 वर्ष माझ्या कारकिर्दीतील सर्वात वाईट काळ होता.
मी खूप स्पष्टवक्ता होतो, म्हणून मी लोकांना नाराज केले
तो पुढे म्हणाला, 'आता प्रत्येकजण यूट्यूबचा वापर करतात, परंतु माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मी फक्त हेडलाइन्स बनवण्यासाठी विचित्र गोष्टी करायचो. मी जेव्हा टीव्हीवर काम केले तेव्हा माझ्या कामाने लोकांचे मनोरंजन झाले. पण त्याचबरोबर मी अनेकांना नाराजही केले. आज जेव्हा मी माझ्या काही मुलाखती पाहतो तेव्हा मला असे वाटते की मी टाइम मशीन घेऊन परत जाऊ शकेन आणि त्या माणसाला थांबवून 'मूर्ख, तू काय म्हणत आहेस? असा जाब विचारेन.
मी खूप स्पष्टवक्ते असल्यामुळे मी लोकांना नाराज केले. जेव्हा जेव्हा मला ते कळले तेव्हा मी माफी मागतो, परंतु त्यामुळे जर तुमचे काम थांबले तर तुम्ही तुमच्या आयुष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करू लागता. आता मला फक्त काम करत शांतपणे जगायचे आहे. असे म्हणत साजिद खान भावूक झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.