Aaliyah Kashyap SAAM TV
मनोरंजन बातम्या

Aaliyah Kashyap : आलियाने बांधली परदेशी बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ; लेकीच्या लग्नात ढोल-ताशाच्या तालावर थिरकले अनुराग कश्यप, पाहा VIDEO

Aaliyah Kashyap Wedding Photos : अनुराग कश्यपची लेक आलिया नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. तिच्या लग्न सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Shreya Maskar

प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मुलीचा नुकताच लग्न सोहळा पार पडला आहे. आलिया कश्यपने (Aaliyah Kashyap ) तिचा बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयरसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते. आलिया कश्यपने वयाच्या २३ वर्षी लग्नगाठ बांधली आहे.

आलिया आणि शेन ग्रेग्रोयर यांचा 2023 मध्ये साखरपुडा पार पडला होता. आता त्यांचा शाही विवाह सोहळा 11 डिसेंबरला पार पडला. त्यांचे लग्न मुंबईच्या बॉम्बे क्लब महालक्ष्मी रेसकोर्समध्ये पार पडले. याच्या लग्नाला बॉलिवूडचे अनेक मंडळी आले होते. आलियाने आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोंना आलियाने खूप खास कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "Now And Forever" त्यांच्या या फोटोंवर चाहते आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छा आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे.

आलिया-शेन ग्रेग्रोयर लग्नातील लूक

आलिया आणि शेन ग्रेग्रोयर (Shane Gregoire) दोन्ही लग्नामध्ये खूप सुंदर दिसत होते. आलिया पेस्टल रंगात ऑफ व्हाइट पिंक कलरमध्ये लेहेंगा परिधान केला होता. तर शेन ग्रेग्रोयर त्याच रंगाला मॅचिंग अशी शेरवानी घातली होती. दोघांचाही पारंपारिक लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.

अनुराग कश्यप यांचा डान्स

लेकीच्या लग्नात अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांनी भन्नाट डान्स केला. ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपने ठेका धरला. त्यांचा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आलिया-शेन ग्रेग्रोयरची लव्ह स्टोरी

आलिया आणि शेन ग्रेग्रोयरची पहिली भेट डेटिंग अॅपवर झाली होती. त्यानंतर ते दोघे छान बोलत राहीले आणि कालांतराने त्यांच्यात चांगली मैत्री झाली. अखेर शेन ग्रेग्रोयरनं बालीमध्ये आलिया कश्यपला प्रपोज केले. त्यांनंतर त्यांनी आपले नाते घरी सांगितले आणि २०२३ मध्ये त्यांचा साखरपुडा पार पडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

SCROLL FOR NEXT