Aaliyah Kashyap : हळद लागली...! आलिया बुधवारी करणार लग्न; अनुराग कश्यपचा होणारा जावई कोण?

Aaliyah Kashyap-Shane Gregoire : अनुराग कश्यपची लेक आलिया कश्यप बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयरसोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्यांच्या हळदी समारंभाचे फोटो पाहा.
Aaliyah Kashyap-Shane Gregoire
Aaliyah Kashyap SAAM TV
Published On

बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची लेक आलिया कश्यप (Aaliyah Kashyap) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. आलिया कश्यप तिचा बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयरशी लग्नगाठ बांधणार आहे. सध्या सोशल मीडियावर आलियाच्या हळदीचे फोटो व्हायरल होत आहेत.

आलिया कश्यप आणि शेन ग्रेगोयरने 2023 मध्ये साखरपुडा केला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया कश्यप आणि शेन ग्रेगोयरचे लग्न मुंबईतील महालक्ष्मी रेसकॉर्स येथे पार पडणार आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि लेक आलिया कश्यप यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यांच्या या फोटोवर चाहते आणि कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 2023मध्येच शेनने आलियाला प्रपोज केले होते. त्यांच्या हळदी समारंभाला बॉलिवूडचे तिचे अनेक मित्रमंडळी आले होते.

आलिया कश्यप

आलिया आणि शेन अनेक काळापासून एकमेकांना डेट करत होते. आलिया कश्यप हिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. ती एक युट्युबर आहे. आलिया वयाच्या 23 वर्षी लग्न करणार आहे. आलिया कश्यप नेहमीच तिच्या हटके आणि बोल्ड स्टाइलमुळे चर्चेत असते.

शेन ग्रेगोयर कोण?

शेन ग्रेगोयर (Shane Gregoire ) दिग्दर्शक अनुराग कश्यपचा होणार जावई आहे. तो अनुराग कश्यपची लेक आलिया कश्यपसोबत लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. शेन ग्रेगोयर हा उद्योजक आहे. तो अमेरिकेचा रहिवासी आहे. सध्या त्याचे वय 24 वर्ष आहे. शेन ग्रेगोयर हा रॉकेट पॉवर्ड साउंड नावाच्या कंपनीचा संस्थापक आहे.

अनुराग कश्यप

अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांनी अनेक हिट चित्रपट केले आहेत. लोकप्रिय दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक आहेत. गँग्ज ऑफ वासेपूर, सेक्रेड गेम, नो स्मोकिंग, ब्लॅक फ्रायडे, गुलाल हे त्यांचे चित्रपट खूप हिट झाले आहेत. चाहत्यांना आता त्यांच्या आगामी चित्रपटांची उत्सुकता लागली आहे.

Aaliyah Kashyap-Shane Gregoire
Pushpa 2 Box Office Collection Day 4: बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा'चा जलवा; वाचा संडे कलेक्शन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com