बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीने प्रभासला जोकर म्हटल्याने अनेकांना नवल वाटलंय. 'Kalki 2898 AD' चित्रपट आपल्याला फारसा आवडला नसल्याचं सांगताना अर्शद वारसीने प्रभास जोकर वाटत असल्याचं म्हटलंय. त्याचवेळी त्याने अमिताभ बच्चन यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. त्यांच्या वयात आपण असं काम करू शकू की नाही याबाबत त्याने शंकाही व्यक्त केली. दुसरीकडे त्याने प्रभासवर टीका केली.
प्रभासला जोकर म्हटल्याचं दिग्दर्शक अजय भुपतीला आवडलं नसून त्याने अर्शद वारसीला चांगलेच खडेबोल सुनावलेत. अजय भुपती 'RX 100' आणि मंगलावरमसारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे. अर्शद वारसीने केलेल्या विधानानंतर त्याने प्रभासची बाजू मांडली. अर्शद वारसीच्या विधानावर टीका करताना त्याने एक्सवर पोस्ट शेअर केलीय. "प्रभास असा व्यक्ती आहे ज्याने आपलं सर्वस्व दिलंय.
भारतीय सिनेमाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी काहीही करू शकतो. तो आपल्या देशाचा अभिमान आहे"., अशा शब्दात अजयने प्रभासच्या कामाचं कौतुक केलं. त्याचबरोबर त्याने अर्शद वारसीला सुनावलंय. "आम्ही त्या चित्रपटाबद्दलची ईर्षा तुमच्या डोळ्यात पाहू शकतो. कारण तुम्ही निस्तेज झालात. कोणीही तुमच्याकडे लक्ष देत नाही. आपले मत व्यक्त करण्याची एक मर्यादा आणि मार्ग आहे. तुम्ही तेच आहात जे तुम्ही त्याच्याबद्दल सांगितलंय". अशा शेलक्या शब्दात अजयने अर्शदला सुनावले आहे.
काय म्हणाला होता?
"मी कल्की पाहिला, मला आवडला नाही. अमितजींनी आजवर खूप चांगलं काम केलं. मी त्या माणसाला कधीच समजू शकत नव्हतो. खरंच बोलतोय जर आपल्यात त्या माणसाइतकी ताकद असेल, तर आयुष्यात आपण कुठेच थांबणार नाहीत. ते अनरिअल आहेत," पण "प्रभास, मला फार वाईट वाटतंय. पण तो असा जोकरसारखा का दिसत होता? मला त्याला मॅड मॅक्स, मेल गिस्बनसारखं पाहायचं आहे. तुम्ही त्याला काय बनवलं. दिग्दर्शक असं का करतात? हे मला समजत नाही,"असं अर्शद म्हणालाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.