Exit Poll : धीरज देशमुख पुन्हा आमदार होणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?

Latur Gramin Saam TV Exit Poll : धीरज देशमुख दुसऱ्यांदा आमदार होतील, असा अंदाज एक्झिट पोलनं वर्तवलाय.
latur gramanin saam tv exit poll Dhiraj Deshmukh vs Ramesh Karad
latur gramanin saam tv exit poll Dhiraj Deshmukh vs Ramesh Karadlatur gramanin saam tv exit poll Dhiraj Deshmukh vs Ramesh Karad
Published On

Latur Vidhan Sabha Exit Poll 2024 : लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेस आपला गड कायम राखत असल्याचा कौल आलाय. एक्झिट पोलच्या अंदजानुसार लातूर ग्रामीणमध्ये पुन्हा एकदा धीरज देशमुख विजयी होतील. भाजपच्या रमेश कराड यांना तिसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागेल. 2019 विधानसभा निवडणुकीत जवळपास 1 लाख मतांनी धीरज देशमुख यांचा विजय झाला होता. आता पुन्हा एकदा धीरज देशमुख आमदार होतील, असा एक्झिट पोलचा अंदाज आहे.

लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी लातूर ग्रामीण मतदारसंघ हा दरवेळी मोठ्या चर्चेत असतो. लातूर ग्रामीणमधून काँग्रेसकडून धीरज देशमुख दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. त्यांच्या गळ्यात पुन्हा विजयाची माळ पडण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तवलाय. लातूर ग्रामीणमध्ये तिरंगी लढत होत आहे. मनसेचे संतोष नागरगोजे यांनी चूरस वाढवली.

latur gramanin saam tv exit poll Dhiraj Deshmukh vs Ramesh Karad
Saam Exit Poll: डोबिंवली विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपमधून रवींद्र चव्हाण मारणार बाजी? पाहा Exit Poll

लातूर ग्रामीण हा मतदारसंघाची निर्मिती २००८ मध्ये झाली. तेव्हापासून लातूर ग्रामीण मतदारसंघावर काँग्रेसचे एकहाती वर्चस्व राहिलेय. मोदी लाटेतही लातूर ग्रामीण मतदारसंघाने काँग्रेसला सात दिली. २०२४ च्या निवडणुकीतही हा मतदारसंघ काँग्रेसच्या बाजूने उभा राहण्याची शक्यता आहे.

latur gramanin saam tv exit poll Dhiraj Deshmukh vs Ramesh Karad
Maharashtra Exit Polls : शरद पवार की अजित पवार, पिंपरीकरांचा कौल कुणाला? संभाव्य आमदाराचे नाव स्पष्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com