संपूर्ण महाराष्ट्रात बुधवारी मतदान पार पडलं आहे. उद्या म्हणजेच २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूकीचा निकाल लागला असून सर्वांचं लक्ष याकडे आहे. या निकालाच्या आधारावर पुढची ५ वर्ष आता कोणत्या पक्षाची सत्ता येणार? कोण निवडून येणार आणि कोण पडणार? हे नागरिकांना समजणार आहे. अशातच सामचा एक्झिट पोल हाती आला आहे. यावेळी तुमच्या भागात कोणता संभाव्य आमदार असणार ते याची माहिती घेऊया.
धामणगावरेल्वे मतदारसंघात यंदासुद्धा पारंपरिक लढत रंगलीये. भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण अडसड यांचे चिरंजीव प्रताप अडसड यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीपासून या मतदारसंघावर ताबा मिळवला होता. मात्र त्यांची लढत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरेंद्र जगताप यांच्याशी आहे.
सामच्या एक्झिट पोलनुसार, या ठिकाणचे संभाव्य आमदार काँग्रेसचे विरेंद्र जगताप असणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी भाजपला पराभवाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
टिप: सकाळ समूहाच्या सर्व्हेतून एक्झिट पोलचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत. ही फक्त प्राथमिक आकडेवारी आहे. २३ तारखेला राज्यात कुणाचं सरकार स्थापन होणार, याचं चित्र स्पष्ट होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.