Dipika Kakar  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Dipika Kakar : "१४ तास ओटीमध्ये..."; दीपिका कक्करवर झाली शस्त्रक्रिया, शोएब इब्राहिमनं दिलं हेल्थ अपडेट

Dipika Kakar Health Update : दीपिका कक्करच्या नवऱ्याने शोएब इब्राहिमने दीपिकाची हेल्थ अपडेट सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांना दिली आहे. तो नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

टिव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर (Dipika Kakar) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. अलिकडेच तिने आपल्याला स्टेज-2 कर्करोग (Stage-2 cancer) झाल्याची माहिती दिली होती. तेव्हापासून आपले हेल्थ अपडेट दीपिका आणि तिचा नवरा शोएब इब्राहिम ( Shoaib Ibrahim ) चाहत्यांसोबत शेअर करत आहे. आता तिच्या हेल्थ अपडेटची मोठी बातमी समोर आली आहे. शोएब इब्राहिमने सोशल मीडियावर पोस्ट करून ही बातमी चाहत्यांना दिली आहे.

शोएब इब्राहिमची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहते दीपिका कक्कर लवकरच ठीक व्हावी यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम ही टिव्ही इंडस्ट्रीमधील कायम चर्चेत असलेली जोडी आहे. दीपिका कक्करची नुकतीच मोठी शस्त्रक्रिया पार पडली आहे. याचे अपडेट शोएबने चाहत्यांना दिले आहेत.

शोएब इब्राहिम पोस्ट

"सर्वांना नमस्कार, माफ करा, काल रात्री मी तुम्हाला दीपिकाची हेल्थ अपडेट देऊ शकलो नाही, तिची एक लांब शस्त्रक्रिया होती. ती १४ तास ओटीमध्ये होती. पण आता सर्व काही व्यवस्थित झाले आहे. दीपी सध्या आयसीयूमध्ये आहे. तिला थोडा त्रास होत आहे, पण ती स्थिर आहे आणि ती ठीक आहे. तुमच्या प्रेमासाठी, प्रार्थनांसाठी आणि पाठिंब्यासाठी सर्वांचे खूप आभार. ती आयसीयूमधून बाहेर पडल्यानंतर मी तुम्हाला सर्वांना अपडेट करेन. पुन्हा एकदा धन्यवाद!तिच्यासाठी प्रार्थना करत राहा..."

Shoaib Ibrahim

सर्वप्रथम दीपिकाच्या नवऱ्याने शोएब इब्राहिमने दीपिकाच्या लिव्हरमध्ये टेनिस बॉलच्या आकाराचा ट्युमर असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. तसेच तिच्यावर उपचार सुरू असल्याचेही त्याने सांगितले होते. त्यानंतर दीपिकाने पोस्ट शेअर करून तिला स्टेज-2 कर्करोग झाला असल्याची माहिती दिली. तसेच तिच्यावर शस्त्रक्रिया करणार असल्याचे सांगितले. दीपिका कक्कर अलिकडेच सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये पाहायला मिळाली होती. मात्र हेल्थमुळे तिला हा शो अर्ध्यावर सोडावा लागला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CBSEने १०वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षेचं टेंटेटिव्ह वेळापत्रक जाहीर

IND vs BAN : 6,6,6...अभिषेक शर्माची बॅट तळपली; बांगलादेशला फोडून काढलं

Maharashtra Live News Update: आदिवासी समाज संघटना आमदार आणि मंत्री आदिवासी समाजाच्या आरक्षणाबाबत बैठक संपन्न

Pune Politics : मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ शेतकऱ्यांच्या बांधावर; भाजपचा पुण्यात 'आनंदोत्सव'

Chanakya Niti: शिस्तबद्ध माणूस कसं व्हायचं? चाणक्यांनी सांगितली ५ सूत्र

SCROLL FOR NEXT