Dipika Kakar Shoaib Ibramim Baby Name Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dipika Kakar Announces Son Name : मुलाचे नाव सांगितलं अन् व्हिडिओच डिलिट केला; दिपिका कक्करने असं का केलं ? जाणून घ्या

Dipika Kakar Get Trolled : शोएब नेहमीच दिपिका आणि बाळाबाबत अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकतच दिपिकाने तिच्या व्लॉगमध्ये बाळाचं नाव जाहीर केलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Dipika Kakar Shoaib Ibrahim Baby Name : दिपिका-कक्कर(Dipika Kakar) आणि शोएब इब्राहिम(Shoaib Ibrahim) टीव्हीच्या जगातील सुप्रसिद्ध कपल आहे. काही दिवसांपूर्वी दिपिकाने गोंडस मुलाला जन्म दिला. शोएब नेहमीच दिपिका आणि बाळाबाबत अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकतच दिपिकाने तिच्या व्लॉगमध्ये बाळाचं नाव जाहीर केलं.

बिग बॉस विजेती दिपिका नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती नेहमीच नवऱ्यासोबत, कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.त्याचबरोबर दिपिकाचे 'दिपिका की दुनिया' हे युट्यूब(Youtube) चॅनलही आहे. या चॅनलवरुन ती नेहमी वलॉग पोस्ट करत असते. एका व्लॉग मध्ये दिपिकाने तिच्या बाळाच्या नावाची घोषणा केली.

काही दिवासांपूर्वी दिपिका शोएब बाळाला घरी घेऊन जाता स्पॉट झाले होते. बाळाला घरी नेल्यानंतरचा व्लॉग शोएबने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यानंतर दिपिकाने तिच्या एका व्लॉगमध्ये बाळाचे नाव 'रुहान इब्राहीम' असल्याचे सांगितले. रुहानचा अर्थ दयाळू आणि आध्यातमिक असा आहे. दिपिकाने मुलाचे नाव मुस्लिम ठेवल्यामुळे नेटकऱ्यांनी दिपिकाला ट्रोल केले. त्यामुळे दिपिकाने तो व्हिडिओ लगेचच डिलिट केला.

दिपिकाने मुलाचे नाव अजूनही अधिकृतपणे जाहीर केले नाही. पण दिपिकाच्या त्या व्हिडिओवरुन नेटकऱ्यांनी अनेक अंदाच बांधायला सुरवात केली. दिपिकाने २१ जून रोजी मुलाला जन्म दिला. सोशल मीडियावरुन नवरा शोएबने ही माहिती सर्वांना दिली. दिपिकाची प्री मॅच्युर डिलिव्हरी झाल्याचेही शोएबने सांगितले. दिपिका आणि शोएबच्या बाळाला काचेत ठेवण्यात आले होते.

काही दिवसांपूर्वी दिपिका आणि शोएब बाळाला घरी घेऊन जाताना स्पॉट झाले होते. दिपिका-शोएबने बाळाचे स्वागत अगदी जंगी केले होते. शोएबने बाळाच्या आगमनाचा व्हिडिओ युट्यूबवर शेअर केला आहे.

दिपिकाने काही दिवसांपूर्वी इंडस्ट्रीचा निरोप घ्यायची घोषणा केली. दिपिकाने आईपणाचा आनंद घेण्यासाठी हा मोठा निर्णय घेतला आहे. दिपिकाच्या या निर्णयामुळे चाहत्यांना मात्र मोठा धक्काच बसला आहे.दिपिका जरी इंडस्ट्रीत काम करणार नसली तरी ती तिच्या यूट्यूब चॅनलवरुन नेहमी चाहत्यांना संपर्कात राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT