Pune News google
मनोरंजन बातम्या

Dipali Amrutkar Tandale: भारतीय संस्कृतीचा जागतिक मंचावर डंका! पुण्याच्या दीपाली अमृतकर-तांदळे ठरल्या ‘मिसेस गोल्ड हेरिटेज इंटरनॅशनल युनिव्हर्स’

Pune News: थायलंडमध्ये झालेल्या ‘मिस अँड मिसेस हेरिटेज इंटरनॅशनल 2025’ स्पर्धेत पुणेकर दीपाली अमृतकर-तांदळे यांनी ‘मिसेस गोल्ड हेरिटेज इंटरनॅशनल युनिव्हर्स’ हा किताब जिंकत भारतीय संस्कृतीची विविधता जागतिक स्तरावर दिमाखात सादर केली.

Sakshi Sunil Jadhav

थायलंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या 'मिस अँड मिसेस हेरिटेज इंटरनॅशनल–२०२५' या भव्य जागतिक स्पर्धेत पुण्याच्या दीपाली अमृतकर-तांदळे यांनी अभिमानास्पद यश मिळवत 'मिसेस गोल्ड हेरिटेज इंटरनॅशनल युनिव्हर्स' हा मानाचा किताब पटकावला. भारतीय संस्कृती, परंपरा आणि वारशाचे दैदिप्यमान सादरीकरण करत त्यांनी जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकली.

भारतामध्ये परतल्यानंतर पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना दीपाली यांनी आपल्या या यशामागचा संघर्षमय प्रवास स्पष्टच सांगितला. पिंपळेगुरव येथील रहिवासी असलेल्या आणि आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या दीपाली या पत्नी आणि आईची जबाबदारी समर्थपणे सांभाळत स्वतःची स्वप्नेही पूर्ण करत आहेत. हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसून आलं.

''जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणे हा आयुष्यातील अभिमानाचा क्षण होता.'' असे दीपाली म्हणाल्या. या स्पर्धेत किड्स, मिस आणि मिसेस अशा तीन विभागांत तब्बल २५ देशांतील ४० स्पर्धक सहभागी झाले होते. त्यांनी या सर्व स्पर्धकांमध्ये आपली कला, प्रतिभा आणि भारतीय संस्कृतीची झलक प्रभावीपणे सादर करत न्यायमूर्तींचं लक्ष वेधून घेतलं.

स्पर्धेदरम्यान विविध देशांच्या स्पर्धकांनी आपापल्या देशातील वारसा, संस्कृती आणि परंपरांचे दर्शन घडवत जागतिक एकतेचा संदेश दिला. दीपाली यांनी बंगाली पेहराव, राजस्थानी संस्कृती आणि मराठमोळ्या नववारी साडीतील सुंदर सादरीकरणाच्या मदतीने भारतीय संस्कृतीची विविधता नृत्यातून आणि गणेशस्तवनातून मांडली. त्यांच्या सादरीकरणानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि 'भारत' हे नाव पुन्हा एकदा जागतिक मंचावर घुमले.

आयटी क्षेत्रातील नोकरीसोबत 'पेजंट ऑफ हेरिटेज' सारख्या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी तयारी करणे हा खडतर प्रवास होता, असं दीपाली यांनी सांगितलं. ''हा प्रवास आव्हानात्मक होता, पण भारतीय संस्कृतीला जागतिक व्यासपीठावर स्थान मिळवून देण्याची संधी असल्याने तो अत्यंत प्रेरणादायी ठरला. पत्नी व आई म्हणून कर्तव्य निभावत असतानाच हा किताब जिंकणे म्हणजे दुहेरी अभिमान आहे'' असे त्या म्हणाल्या.

दीपाली अमृतकर-तांदळे यांनी जिंकलेला ''मिसेस गोल्ड हेरिटेज इंटरनॅशनल युनिव्हर्स'' हा किताब फक्त त्यांच्यासाठीच नव्हे, तर भारतासाठी आणि विशेषतः पुण्यासाठी सन्मानाची बाब ठरली आहे. त्यांच्या यशामुळे भारतीय संस्कृतीचे जागतिक स्तरावर अधिक प्रभावी प्रतिनिधित्व झाले असून, अनेक महिलांसाठी प्रेरणादायी मार्ग खुला झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतातील सर्वात मोठा घोड्यांचा बाजार महाराष्ट्रात! १० कोटी किंमत, ६९ इंच उंच मोरणीचा रुबाब एकदा बघाच|VIDEO

महायुतीत प्रवेशबंदीचा तह, मुख्यमंत्र्यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा

Maharashtra Live News Update: मुंबईच्या नागपाडा येथे लाकडावाला बाजाराला मोठी आग

रोहित शर्मानं इतिहास रचला! सचिन तेंडुलकर-विराटच्या स्पेशल क्लबमध्ये एन्ट्री

India vs South Africa 3rd ODI: वचपा काढला! विजयी चौकार लगावत टीम इंडियाचा शानदार विजय

SCROLL FOR NEXT