diljit dosanjh in border 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Diljit Dosanjh: 'बॉर्डर २'चं सक्सेस बघून भावुक झाला दिलजीत दोसांझ, म्हणाला- मला कधीच माहित नव्हतं...

Diljit Dosanjh: दिलजीत दोसांझच्या बॉर्डर २ चित्रपटाला मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे खूप आनंदी आहे. यासह त्याने त्याच्या चाहत्यांसोबत एक भावनिक किस्सा देखील शेअर केला.

Shruti Vilas Kadam

Diljit Dosanjh: बॉर्डर २ चित्रपटगृहांमध्ये हिट सुरु आहे. चित्रपटाला मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादावरून चित्रपटाबद्दलची चर्चा आणखी रंगली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही उत्तम कलेक्शन करत आहे. सनी देओलसह वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्या अभिनयाचेही कौतुक होत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर, दिलजीत दोसांझने बॉर्डरशी संबंधित एक खास आठवण सांगितली आहे.

माझ्याकडे बॉर्डर पाहण्याचे पैसे नव्हते

दिलजीत म्हणाला, "मला आठवते की जेव्हा पहिला बॉर्डर प्रदर्शित झाला तेव्हा बरेच लोक तो पाहण्यासाठी गेले होते, पण मी पाहू शकलो नाही कारण माझ्याकडे पैसे नव्हते. माझ्या कुटुंबानेही मला पैसे दिले नाहीत कारण त्यांच्याकडेही जास्त पैसे नव्हते. मला खरोखर चित्रपट पहायचा होता, पण मला माहित नव्हते की एके दिवशी मला या चित्रपटात काम करण्याची संधी मिळेल."

दिलजीत दोसांझने साकारलेली व्यक्तिरेखा

दिलजीतने त्याचे पात्र, फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखोनबद्दल देखील सांगितले, ज्यांना परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले आहे. तो म्हणाला, "निर्मलजीत सिंग सेखोनची भूमिका साकारणे खूप छान होते. जर तुम्ही त्यांच्याबद्दल वाचले नसेल, तर तुम्ही त्यांच्याबद्दल नक्कीच वाचले पाहिजे आणि त्यांचे जीवन समजून घेतले पाहिजे."

बॉर्डर २ मधून काढण्याची मागणी

दिलजीतला चित्रपटातून काढून टाकण्याची मागणी करण्यात आली होती. गेल्या वर्षी दिलजीतच्या कास्टिंगमुळे बराच वाद निर्माण झाला होता. खरं तर, दिलजीतचा चित्रपट "सरदार जी ३" मध्ये पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर देखील होती. पहलगाम हल्ल्यानंतर, पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करण्यास बंदी घालण्यात आली होती. हा चित्रपट भारताव्यतिरिक्त इतर अनेक देशांमध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर लोकांनी दिलजीतला ट्रोल करण्यास सुरुवात केली. काहींनी तर दिलजीतला 'बॉर्डर २' मधून काढण्याची मागणी केली.

बॉर्डर 2चे तीन दिवसाचे कलेक्शन

'बॉर्डर 2' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 30 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 35 कोटी रुपये कमावले आहे. चित्रपटाने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी देखील बक्कळ कमाई केली आहे. चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे. रिपोर्टनुसार,'बॉर्डर 2' ने तिसऱ्या दिवशी 54.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत 121 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lung inflammation symptoms: फुफ्फुसांना सूज आल्यावर शरीरात ही लक्षणं दिसून येतात

Baby Food: १ वर्षापेक्षा लहान बाळांना देऊ नका हे २ पदार्थ! डॉक्टरांनी काय सल्ला दिला? वाचा...

Ghatkopar: घाटकोपरमध्ये तिरंग्यावरून वाद, दोन गटात तुंबळ हाणामारी; VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: पुण्यातील नीलसागर सोसायटीत गादी कारखान्याला भीषण आग

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन! चित्ररथातून घडवला गणेशोत्सवाचा अनुभव | VIDEO

SCROLL FOR NEXT